Sane Guruji Jayanti : साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांचे काही प्रेरणादायी विचार
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sane Guruji Jayanti : साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांचे काही प्रेरणादायी विचार

Sane Guruji Jayanti : साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांचे काही प्रेरणादायी विचार

Dec 24, 2024 09:23 AM IST

Sane Guruji Jayanti 2024 In Marathi : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांची आज जयंती असून, २४ डिसेंबर १८९९ ला दापोली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार.

साने गुरुजी जयंती
साने गुरुजी जयंती

Sane Guruji Motivational And Inspirational Thoughts In Marathi : साने गुरुजी यांची आज जयंती असून, पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ ला दापोली तालुक्यातील पालगड येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला माध्यमिक शिक्षण दापोली, औंध येथे झाले. त्यानंतर ते पुण्याला गेले.

साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र अशा साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हे त्यांचे उद्दिष्ट होते. श्यामची आई हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट काढला. त्याला उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

येरवडा तुरुंगातील साने गुरुजींची एक आठवण फार हृद्य आहे. साने गुरुजी नेहमी म्हणत की, प्रत्येक भारतीयाने मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एक तरी भारतीय भाषा शिकली पाहिजे. ते स्वत: राजमहेंद्रीच्या तुरुंगात असताना तमिळ भाषा शिकले होते. 

जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले. अशा साने गुरुजींनी नैतिक बोध आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं तसेच पुस्तके लिहीली. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार.

साने गुरुजी यांचे प्रेरणादायी विचार -

जिथून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.

...

आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.

...

आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.

...

दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.

...

करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.

...

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.

...

जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते, दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.

Whats_app_banner