छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती १४ मे या दिवशी असते. मात्र, त्यांच्या तारखेवरुन वाद असल्याने आणि पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही साजरी करतात. त्यामुळे महाराजांची जयंती एकाच वर्षी दोन वेळा साजरी होते. या दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते.
शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले हे त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मराठा राज्याचे दुसरे शासक बनले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी संभाजीराजे भोसले यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. स्टेटस ठेवण्यासाठी आणि नातलगांना पाठवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त या शुभेच्छांचा उपयोग होईल.
छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला
त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
…
प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर”
“क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे संभाजी राजे ‘छत्रपती’
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
…
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे,
तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
…
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या
छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम.
…
मृत्यूलाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा शिवबाचा छावा.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
…
वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते
वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती,
एक देदिप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.
महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.
…
जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा
…
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गीते गाती,
ज्याची ओवाळूनी पंचारती
तो एक केवळ ‘संभाजी राजा’
संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा