Rishi panchami 2023 : आज ऋषी पंचमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र
Rishi Panchami Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला केले जाणारे ऋषी पंचमी व्रत आज, २० सप्टेंबर रोजी साजरं होत आहे. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी.
Rishi Panchami Vrat 2023 : हिंदू धर्मात व्रतवैकल्यांचं महत्त्व अपरंपार आहे. दिवसेंदिवस ही व्रतवैकल्ये करणाऱ्या श्रद्धांळूंची संख्या वाढत आहे. महिलावर्गामध्ये विविध व्रतांचे महत्त्व खूपच असते. ऋषी पंचमी देखील यास अपवाद नाही.
ट्रेंडिंग न्यूज
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यंदा २० सप्टेंबर २०२३ रोजी ऋषीपंचमी आलीय. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाते. त्यासाठी व्रत ठेवलं जातं. ऋषीपंचमीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानं महिलांना सुख लाभतं आणि त्यांचं सौभाग्य वाढतं. या व्रतामुळं महिला जाणीवपूर्वक किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त करतात अशी मान्यता आहे. या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे.
ऋषी पंचमी व्रताचा यंदाचा शुभ मुहूर्त
शुक्ल पक्षातील ही पंचमी यंदा १९ सप्टेंबर २०२३ रोजी १ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि २० सप्टेंबर २०२३ रोजी २ वाजून १६ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळं बहुतेक ठिकाणी यंदा हे व्रत २० सप्टेंबरला म्हणजेच, बुधवारी साजरं केलं जाणार आहे.
पूजेची शुभ वेळ
ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ०१ मिनिटांपासून दुपारी १ वाजून २८ मिनिटांपर्यंत पूजेसाठी उत्तम वेळ आहे. या वेळेत सात ऋषींची उपासना केल्यास शुभ फळ प्राप्त होते.
कशी करावी पूजा?
ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं. यानंतर आंघोळ करून स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालावे. देवघराची स्वच्छता करावी. त्यानंतर एका छोट्या टेबलावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा. देवघरात सात ऋषी आणि आपल्या गुरूंचा फोटो ठेवा. यानंतर सात ऋषींना फळे, फुले, धूप, दीप आणि पंचामृत अर्पण करा. भक्तिभावानं त्यांची आरती करा आणि आशीर्वाद घ्या. नंतर शांत चित्तानं ऋषी पंचमीच्या व्रताची कथा ऐका. असं केल्यानं भाविकांची सर्व दुःखं दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. देवाला नैवेद्य अर्पण करून हा प्रसाद सर्वांना वाटा आणि स्वत:ही सेवन करा.
या मंत्राचं पठण करा!
कास्यपोतिर्भारद्वाजो विश्वामित्रय गौतम: ।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ।
गृह्यन्तवर्ध्य माया दतम् भविष्यात सदैव तृप्त रहा.
ऋषी पंचमीच्या दिवशी या मंत्राचं पठण करणं शुभ मानलं जातं. या मंत्राच्या जपानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. अनुकरण करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)