Gemstone : गणेशोत्सवानिमित्त लोक दररोज गणेशाची पूजा करतात. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपायही करतात. दरम्यान तुम्ही गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी रत्नजडित उपाय करून पाहू शकता. हे उपाय केल्याने पैशाची कमतरता भासत नाही. जीवनात या उपायांचे पालन केल्यास आर्थिक लाभ होतो. गणेशोत्सवाच्या योग-संयोगात जाणून घ्या रत्नांशी संबंधित उपाय.
ज्योतिषशास्त्रात पन्ना रत्नाला बुधाचे रत्न मानले जाते. हे हिरव्या रंगाचे रत्न आहे. कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी हे रत्न धारण करणे फायदेशीर मानले जाते. हरिश्चंद्र विद्यालंकार लिखित रत्नपरिचय या ग्रंथानुसार हे रत्न बुध ग्रहाचे वर्चस्व असलेल्या काळात जन्मलेल्या लोकांनी धारण केले पाहिजे. १५ जून ते १४ जून किंवा १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान जन्मलेले लोक पन्ना घालू शकतात. मूलांक ५ म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हे रत्न शुभ मानले जाते. हे रत्न अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते जे लवकर घाबरतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिंताग्रस्त होतात. मात्र, चांगल्या परिणामांसाठी हे रत्न ज्योतिषाचा सल्ला घेऊनच धारण करा. पन्ना रत्न घालण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊया...
रत्न ज्योतिष शास्त्रानुसार पन्ना सोन्याच्या अंगठीत घातला पाहिजे. हे रत्न नेहमी मधल्या बोटात धारण करा. ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोक हे रत्न सूर्योदयानंतर २ तासांनी घालू शकतात. बुधवारी हे रत्न धारण करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. जे लोक पन्ना रत्न परिधान करू शकत नाहीत ते एक्वामेरीन परिधान करू शकतात. हे रत्न श्रीगणेशाच्या चरणी ठेऊन श्रीगणेशाची पूजा करावी. गणपतीच्या १२ नावांचा उच्चार करा. मनातल्या मनात गणपतीचे नामस्मरण करताना हाताच्या बोटावर रत्न धारण करा.
असे मानले जाते की, पन्ना धारण केल्याने बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते. असे म्हणतात की पन्ना धारण केल्याने दृष्टी सुधारते. धन, सुख आणि सौभाग्य वाढीसाठी पन्ना रत्न धारण करणे शुभ असते. असेही मानले जाते की, पन्ना धारण केल्याने नातेसंबंध मजबूत होतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी हे रत्न चांगले मानले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)