Rani Lakshmi Bai Punyatithi : 'क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता' झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त करा अभिवादन
मराठी बातम्या  /  धर्म  /  Rani Lakshmi Bai Punyatithi : 'क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता' झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त करा अभिवादन

Rani Lakshmi Bai Punyatithi : 'क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता' झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त करा अभिवादन

Jun 12, 2024 12:50 PM IST

Jhansichi Rani Lakshmi Bai Punyatitini 2024 : शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या, तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची गुरुवार १३ जून २०२४ रोजी तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अभिवादनाचे पोस्ट करूया.

झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी माझी झाशी देणार नाही असे राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना खडसावून सांगितले होते. राणी लक्ष्मीबाईंनी शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान दिले होते. तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई होय.

वयाच्या ३० व्या वर्षी १८ जून  या शुर राणीची दिनांक १३ जून २०२४ रोजी, तिथीप्रमाणे पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ असंही म्हटलं जातं. इ.स. १७ जून १८५८ (शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी) रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या. १८ जूनला इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले.

झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

झुंजार लढली रणरागिणी

राणी लक्ष्मीबाई मर्दानी

झाशीची राणी लक्ष्मीबाई

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।

झाशी संस्थानच्या अधिपती राणी लक्ष्मीबाई यांचा

पराक्रम, शौर्य, साहस हे अजूनही भारतीयांच्या मनात कोरले गेले आहे.

राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!

झाशीची राणी लक्ष्मीबाई

एकच होती नार!

ढाल छातीशी, पुत्र पाठीशी,

कमरेला तलवार!

स्वातंत्र्याचे निशाण

आम्ही नाही सोडणार...

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!

मातृभूमीच्या स्वतंत्रतेसाठी

आपल्या असीम शौर्यातून

बलिदान देत स्वातंत्र्यलढ्याचे

अग्निकुंड उजळून टाकणाऱ्या

झाशीच्या राणी ' लक्ष्मीबाई ' यांना

पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

मूर्तिमंत शौर्य धैर्य व स्वाभिमानाचे

प्रतीक असणाऱ्या

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना

पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन...

शौर्यतेचे प्रतीक

शुरतेची पराकाष्टा

झाशीची राणी लक्ष्मीबाई

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता

युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि

थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या

राणी लक्ष्मीबाई यांच्या

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

तडफदार व्यक्तिमत्व,

देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी,

प्रसंगी आपल्या कुटूंबाला,

रुढी-परंपरांना न जुमानता

स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारी

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Whats_app_banner