rang panchami 2024 upay : होळीच्या ५ दिवसांनी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. रंगपंचमीला देशातील काही भागात वसंत उत्सव असेही म्हणतात. भारतातील अनेक भागात होळीचा सण दोन ते पाच दिवस चालतो. पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यावर्षी हा सण आज ३० मार्च रोजी साजरा होत आहे.
रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्ण, भगवान राम आणि भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाचा गुलाल अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय, पिवळ्या रंगाचे कपडे देखील अर्पण करणे चांगले मानले जाते. असे केल्याने देव प्रसन्न होतो आणि ते सर्व मनोकामना पूर्ण करतात. जर तुमची काही इच्छा असतील आणि ज्या बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पाहा.
ज्योतिषशास्त्रानुसार रंगपंचमीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप कमी असते. या दिवशी कोणताही उपाय केल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. अशा स्थितीत रंगपंचमीला सकाळी पवित्र स्नान करून विधीनुसार शिव-पार्वतीची पूजा करून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने तुमची सर्व कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल.
रंगपंचमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. यानंतर आपल्या कुलदेवतेचे ध्यान करताना खुल्या आकाशाखाली गुलाल उधळावा. हा उपाय केल्याने सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होईल. याशिवाय घरात सुख-शांतीसोबतच धन-समृद्धीही राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)