यंदा ११ एप्रिल २०२४ रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते. चंद्राचे दर्शन झाल्यानंतरच जगभरात ईद साजरी केली जाते.
ईद-उल-फित्र रमजान, इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो. जगभरातील मुस्लिमांसाठी रमजानमध्ये मिळालेल्या आध्यात्मिक सिद्धी आणि आशीर्वाद साजरे करण्याचा हा आनंदाचा प्रसंग आहे.
रमजान महिन्यातच इस्लामचे ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवीन कपडे परिधान करून मशिदीत जातात. नमाज पडतात. एकमेकांना शुभेच्छाही देतात. तसेच, या दिवशी घरोघरी शिरखुर्मासारखे गोड पदार्थ बनवले जातात. या रमजान ईदनिमित्त शुभेच्छा पाठवायला विसरू नका.
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!
ईद मुबारक!
…
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
…
चंद्रदर्शन करून रोजा संपवूया
रमजान ईद निमित्त भेटवस्तू देऊया
रमजान ईद मुबारक
…
तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो,
सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!
…
रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा
…
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा खास दिवस
तुम्हाला सर्वांना ईद मुबारक
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
…
तुम्हाला आणि तुमच्या परिवारला
आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!
…
फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक आणि
तुम्हास रमजान मुबारक
…
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो
प्रत्येक दिवस ईदच्या दिवसासारखा खास राहो
तुम्हाला कोणतेच दुख नसो
ह्याच या ईदनिमित्त सदिच्छा
ईद मुबारक