मराठी बातम्या  /  धर्म  /  Ramadan Wishes : रमजान मासारंभानिमित्त खास शुभेच्छा संदेश, वाचा आणि पाठवायला विसरू नका

Ramadan Wishes : रमजान मासारंभानिमित्त खास शुभेच्छा संदेश, वाचा आणि पाठवायला विसरू नका

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 11, 2024 10:11 PM IST

Ramadan 2024 Wishes : मंगळवार १२ मार्च पासून मुस्लिम रमजान मासारंभाची सुरवात होत आहे. यानिमित्त द्या खास शुभेच्छा, वाचा आणि पाठवायला विसरू नका.

रमजानच्या शुभेच्छा
रमजानच्या शुभेच्छा

भारतात १२ मार्चपासून रमजान महिना सुरू होणार आहे. तसेच या दिवशी पहिला उपवास केला जाणार आहे. चंद्रदर्शनाची ही परंपरा मुस्लिमांसाठी महत्त्वाची आहे कारण ती रमजानची सुरुवात आणि उपवास, दान आणि उपासनेची वेळ दर्शवते.

कॅलेंडरच्या आठव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिलाल म्हणजेच अर्धचंद्र दिसल्यानंतर रमजान महिन्याची सुरुवात होते, असे मानले जाते. मुस्लिम रमजान मासारंभानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश.

रमजाननिमित्त शुभेच्छा

हा रमजान तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी

आनंद आणि समृद्धीचा असू दे

रमजानच्या हार्दिक शुभेच्छा

शांती, समृद्धी आणि आनंदाने भरलेल्या

रमजानसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

अल्लाह तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना

भरपूर आशीर्वाद देवो.

रमजान म्हणजे वसंत ऋतु.

माफीचा पाऊस पडतो,

अल्लाहची दया पृथ्वीला

गुंडाळते आणि उबदार करते.

रमजानच्या खूप खूप शुभेच्छा

 

रमजान २०२४ शुभेच्छा
रमजान २०२४ शुभेच्छा (AP)

फुलांना बहर मुबारक

शेतकऱ्याला पीक मुबारक

पक्ष्यांना उडान मुबारक

चंद्राला तारे मुबारक

आणि तुम्हास रमजान मुबारक

सेहरी आणि इफ्तार

असो तुमच्यासाठी बहारदार

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत

रमजान च्या शुभेच्छा!

जसे चंद्रकोर चंद्र दिसतो आणि

रमजानचा आशीर्वादित महिना सुरू होतो,

तुम्हा आम्हा सर्वांना या रमजानच्या

खूप खूप शुभेच्छा

क्षमा, दया आणि नरकापासून

मुक्तीचा खजिना म्हणजे रमजानचा महिना.

मुस्लिम रमजान मासारंभच्या हार्दिक शुभेच्छा

अल्लाह तुमचे सर्व नमाज आणि रोजा स्वीकारो

रमजान महिन्यात प्रत्येकाला सर्वकाही मिळो

सर्वांना रमजानच्या शुभेच्छा, रमजान मुबारक

तुमचे मन व हृदय

प्रेम, चांगल्या इच्छा आणि पवित्रतेने

भरले जावो.

रमजान च्या शुभेच्छा

तुमचा इफ्तार आणि सुहूर

शांती आणि आनंदाने भरलेला जावो.

रमजान करीम मुबारक

WhatsApp channel

विभाग