Ramadan 2024 : उद्यापासून सुरू होणार रमजानचा पवित्र महिना, सेहरी आणि इफ्तारची वेळ नोंद करा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ramadan 2024 : उद्यापासून सुरू होणार रमजानचा पवित्र महिना, सेहरी आणि इफ्तारची वेळ नोंद करा

Ramadan 2024 : उद्यापासून सुरू होणार रमजानचा पवित्र महिना, सेहरी आणि इफ्तारची वेळ नोंद करा

Mar 11, 2024 02:15 PM IST

Ramadan 2024 Starts Date : रमजानचा उपवास २९ किंवा ३० दिवसांचा असतो. इस्लाम धर्मात असे म्हटले जाते की रमजानमध्ये उपवास केल्याने अल्लाह प्रसन्न होतो आणि सर्व प्रार्थना स्वीकारतो.

Ramadan 2024 : उद्यापासून सुरू होणार रमजानचा पवित्र महिना, सेहरी आणि इफ्तारची वेळ नोंद करा
Ramadan 2024 : उद्यापासून सुरू होणार रमजानचा पवित्र महिना, सेहरी आणि इफ्तारची वेळ नोंद करा (AP)

Ramadan 2024 Sehri Iftar Timings : इस्लाम धर्मात रमजान महिना हा सर्वात पवित्र मानला जातो. हा महिना चंद्र पाहून ठरवला जातो. रमजानचा पवित्र महिना हा इस्लामिक कॅलेंडरनुसार नववा महिना असतो. याला रमजानचा महिना असेही म्हणतात. मुस्लिम धर्माचे लोक या संपूर्ण महिन्यात उपवास ठेवतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही सेवन करत नाहीत. 

रमजानचा पहिला उपवास कधी?

कॅलेंडरच्या आठव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिलाल म्हणजेच अर्धचंद्र दिसल्यानंतर रमजान महिन्याची सुरुवात होते, असे मानले जाते. सौदी अरेबियामध्ये रमजान किंवा ईदचा चंद्र पहिल्यांदा दिसतो. यावर्षी भारतात १२ मार्चपासून रमजान महिना सुरू होणार आहे. तसेच या दिवशी पहिला उपवास केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील सेहरी आणि इफ्तारची वेळ जाणून घेऊया.

मुंबई आणि पुण्यातील सेहरी आणि इफ्तारची वेळ

मुंबई: सेहरी: ०५:३८ AM; इफ्तार: ०६:४८ PM

पुणे: सेहरी: ०५:३४ AM; इफ्तार: ०६:४४ PM

रमजानचे महत्व

रमजानचा उपवास २९ किंवा ३० दिवसांचा असतो. इस्लाम धर्मात असे म्हटले जाते की रमजानमध्ये उपवास केल्याने अल्लाह प्रसन्न होतो आणि सर्व प्रार्थना स्वीकारतो. तसेच, या महिन्यात केलेल्या उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत ७० पटीने अधिक मिळते. 

सेहरी म्हणजे काय?

सकाळी सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. यावेळी सेहरी घेतली जाते. रमजान महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी अन्न खाल्ले जाते. याला सहारी म्हणून ओळखले जाते. सेहरीची वेळ अगोदरच ठरवली जाते. सर्व मुस्लिम लोकांसाठी उपवास अनिवार्य मानला जातो, परंतु लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ लोकांना उपवासापासून सूट देण्यात आली आहे.

इफ्तार म्हणजे काय?

दिवसभर खाण्यापिण्याशिवाय उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केली जाते आणि खजूर खाऊन उपवास सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. यानंतर, एखादी व्यक्ती सकाळी सेहरीपूर्वी काहीही खाऊ आणि पिऊ शकते.

Whats_app_banner