Ram Navami 2023 : मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जन्मदिवशी या राशींचं उजळणार भविष्य
Zodiac Signs : अशा मंगलमय प्रसंगी काही विशेष योग जुळून येत आहेत. हे योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत.
रामनवमी आता जेमतेम तीन दिवसांवर आली आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला हिंदू धर्मात भगवंताचं स्थान दिलं गेलं आहे. श्रीराम हे विष्णूचा आवतार होते आणि रावण आणि इतर राक्षसांचा विनाश करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता असं हिंदू धर्मग्रंथ सांगतात. श्री रामनवमी म्हणजे प्रभू श्री रामाचा जन्मदिवस. हिंदू धर्मियांसाठी हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी घरोघरी श्रीरामांचं पूजन केलं जातं. काही ठिकाणी श्रीरामांचा पाळणा हलवला जातो. अशा मंगलमय प्रसंगी काही विशेष योग जुळून येत आहेत. हे योग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. रामनवमीला कोणते शुभ योग जुळून येत आहेत त्यावर आधी एक नजर टाकूया.
ट्रेंडिंग न्यूज
रामनवमीला येणारे विशेष योग कोणते
नवमी तिथी - २९ मार्च, रात्री ०९.०६ ते २० मार्च, रात्री ११.२८ वाजता.
गुरु पुष्य योग - ३० मार्च, रात्री १०.५८ ते ३१ मार्च सकाळी ०६.१० वाजता
अमृत सिद्धी योग - ३० मार्च, रात्री १०.५८ ते ३१ मार्च सकाळी ०६.१२ वाजता
सर्वार्थ सिद्धी योग - ३० मार्च दिवसभर
रवि योग - ३० मार्च, दिवसभर
रामनवमीला कोणत्या राशींचं भाग्य खुलणार
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राम नवमीचा दिवस उत्तम मानला जाणार आहे. या दिवशी नवीन काम सुरू करू शकता. रामनवमीचा दिवस कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी शुभ राहील. दीर्घकाळ रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील.
सिंह
सिंह राशीसाठी हा योग शुभ परिणाम देणारा आहे. या राशीच्या लोकांना भगवान रामाच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कर्जातून मुक्ती मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, नोकरी-व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ
ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना रामनवमीच्या दिवशी चांगली बातमी मिळू शकते. जे विवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)