मराठी बातम्या  /  religion  /  Ram Navami 2023 : आपल्या प्रियजनांना मराठीत द्या रामनवमीच्या शुभेच्छा
भगवान श्रीराम
भगवान श्रीराम (हिंदुस्तान टाइम्स)

Ram Navami 2023 : आपल्या प्रियजनांना मराठीत द्या रामनवमीच्या शुभेच्छा

30 March 2023, 3:07 ISTDilip Ramchandra Vaze

Ram Navami Wishes : रामनवमी देशात उत्साहात साजरी केली जाईल. अशात आपल्या प्रिय व्यक्तींनाही रामनवमीच्या खास शुभेच्छा द्या.

३० मार्च २०२३ रोजी आपण राम नवमी साजरी करणार आहोत. रामनवमी हा सण हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे. असत्याचा नाश करायला, असुरांचा वध करायला श्रीविष्णूच्या अवताराने म्हणजेच श्रीरामांनी याच दिवशी अयोध्येत जन्म घेतला. रामाचं नाव आपल्या मुखी येताजाता असतं. अशात आज रामनवमी आहे आजच्या दिवशी आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबाला रामनवमीच्या शुभेच्छा द्या. काही खास शुभेच्छा संदेश आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

राम नवमीनिमित्त शुभेच्छा संदेश

 

श्री राम नवमी निमित्त

आपणास व आपल्या परिवारास

हार्दिक शुभेच्छा..!

 

श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,

तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,

ज्याच्या मनात श्रीराम नाही,

तो सगळ्यात मोठा दुर्भागी,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दुर्जनांचा नाश करुन

कुशल प्रशासनाचा

आदर्श प्रस्थापित

करणारे मर्यादा पुरुषोत्तम,

श्री रामचंद्र यांना वंदन,

श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

 

छंद नाही रामाचा,

तो देह काय कामाचा,

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मुकुट शिरावर कटि पीतांबर,

वीर वेष तो श्याम मनोहर,

सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम,

कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,

।। रामनवमीच्या शुभेच्छा ।।

 

हाताने केलेलं दान आणि

मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूच नाव

कधीच व्यर्थ नाही जात.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

दशरथ नंदन राम

दया सागर राम

सत्यधर्म पारायण राम

राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा

 

प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो

तुमच्या जीवनाला सुंदर बनवो,

अज्ञानाचा अंधार दूर करून

श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो..!

विभाग