मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami 2023 आर्थिक तंगीने त्रस्त आहात मग रामनवमीच्या दिवशी श्रीरामाला अर्पण करा 'या' गोष्टी

Ram Navami 2023 आर्थिक तंगीने त्रस्त आहात मग रामनवमीच्या दिवशी श्रीरामाला अर्पण करा 'या' गोष्टी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 22, 2023 02:53 PM IST

Things To Do On Ram Navami : रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाला प्रसन्न केल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील असं सांगितलं गेलं आहे.

भगवान श्रीराम
भगवान श्रीराम (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्मात रामाला कायमच आज्ञाकारी, एकवचनी, एकनिष्ठ, सत्य बोलणारा आणि अन्यायासमोर न झुकणारा असा आदर्शवत मानलं गेलं आहे. रामाच्या जीवनावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. रामायण हा धर्मग्रंथ ऋषी वाल्मिकी यांनी लिहिला आणि रामाचं जीवन सर्वसामान्य लोकांच्या समोर आलं. तेव्हापासून श्रीराम हे नाव सदैव सर्वांच्याच मुखी असतं. रामाला भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणूनही पाहिलं गेलं आहे. त्यामुळेच रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाला प्रसन्न केल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील असं सांगितलं गेलं आहे.  

भगवान श्रीरामांना अर्पण करा या वस्तू

बुद्धी आणि विवेक वाढवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाला पलाशची फुले अर्पण करा.

जर तुम्हाला कुटुंबात आनंद आणायचा असेल तर रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना लाल कमळ अर्पण करा.

जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर रामनवमीच्या दिवशी भगवान श्री रामाला  फुले अर्पण करा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

बनलेलं काम बिघडत असेल तर रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाला निळ्या कमळाचे फूल अर्पण करा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

राजकारणात यश संपादन करायचे असल्यास या दिवशी भगवान श्रीरामांना चंदन अर्पण करा आणि चमेलीचे फूल अर्पण करा.

भगवान श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना श्रीखंड आणि कोथिंबीर अर्पण करा. असे म्हटले जाते की या वस्तू अर्पण केल्याने भगवान श्रीराम प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर आपला आशीर्वाद कायम ठेवतात.

उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी, भगवान रामाला गवत अर्पण करा.

रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाला पुरी, रव्याची खीर आणि काळा हरभरा अर्पण करा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग