मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Mandir: भक्तीच्या सुगंधाने दरवळली अयोध्या; १०८ फुटी महाकाय अगरबत्ती पेटवली, Video

Ram Mandir: भक्तीच्या सुगंधाने दरवळली अयोध्या; १०८ फुटी महाकाय अगरबत्ती पेटवली, Video

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 17, 2024 08:57 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya : राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरगुजरातहून आणलेली १०८फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.

108 feet long incense stick got lit
108 feet long incense stick got lit

Ayodhya Ram Mandir News : रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम २२ जानेवारी रोजी ८४ सेकंदाच्या खूपच सुक्ष्म मुहूर्तावर पूर्ण केला जाईल. या कार्यक्रमाची तयारी अयोध्येत मोठ्या उत्साहात सुरू आहे. अयोध्यासह भारतातील कानाकोपऱ्यातील लोकप्रभु श्रीरामाच्या भक्तीत बुडालेले दिसत आहेत. राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गुजरातहून आणलेली १०८फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे. भव्य राम मंदिराच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमामुळे संपूर्ण देशात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाआधीच अनेक प्रकारच्या भेटवस्तू अयोध्येत येत आहेत. यामध्ये प्रभू रामाचे सासर असलेल्या जनकपुरीहून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यातून अष्ट धातूपासून बनलेला घंटा, सोन्याच्या चप्पला, नगारे व १०८ फुटी अगरबत्ती आयोध्येत दाखल झाली आहे.

अयोध्या राम मंदिरच्या उद्घाटनासाठी आणण्यात आलेल्या १०८ फुटी लांब व ३५०० किलो वजनाची अगरबत्तीआज प्रज्वलित करण्यात आली. ही महायकाय अगरबत्ती गुजरात राज्यातील वडोदरा येथून आणण्यात आली आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी ६ महिन्यांचा काळ लागला आहे. ही अगरबत्ती घेऊन २६ लोक १ जानेवारी रोजी अयोध्येकडे रवाना झाले होते. आज ही अगरबत्ती 'जय श्री राम'च्या जयघोषात श्री रामभूमि तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात आली.

या अगरबत्तीची रुंदी ३.५ फूट आहे. यामध्ये १४७० किलो गायीचे गोबर, ४२०किलो जडी-बूटी, ३७६किलो गुग्गुल, ३७६ किलोनारळाच्या करट्या आणि १९० किलो तूप घालून हीअगरबत्ती तयार केली आहे. या अगरबत्तीला खूप सुगंध असून तो अनेक किलोमीटरच्या क्षेत्रात पसरेल. त्याचबरोबर पर्यावरण पूरक ही अगरबत्ती आहे. प्रज्वलित केल्यानंतर ही अगरबत्ती दीड महिने जळत राहणार आहे.

WhatsApp channel