पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यामुळे सर्वच राममय झाले आहेत. फुले, रांगोळ्या, पताके, श्रीराम नाव लिहीलेले केशरी झेंडे सर्वांच्या घरी सजले आहे. आकर्षक सजावट व फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. शब्दांनीही प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष करूया आणि शुभेच्छा देऊन उत्साह वाढवूया.
जन्मोत्सव, विजयोत्सव, गौरवपर्व, व परिवर्तन घडतंय
अयोध्या नगरीसह देशभरात रामनाम सजलय
आज पुन्हा साजरी होत आहे दिवाळी
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या खूप खूप शुभेच्छा
…
त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि परंपरेचे जतन,
एक आदर्श शासक आणि मर्यादा पुरुषोत्तम,
प्रेरणादायी राजा रामचंद्राला हृदयापासून वंदन..
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापण सोहळ्याच्या शुभेच्छा..!
…
प्रभू श्री राम ज्यांचं नाव,
अयोध्या ज्यांचे जन्मगाव,
एक वचनी, एक बाणीमर्यादा पुरुषोत्तमाला प्रणाम..
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापण सोहळ्याच्या शुभेच्छा..!
…
"दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे
मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन,
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
…
छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त खूप खूप शुभेच्छा..!
…
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
…
दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा!
…
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा!
…
मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन,
परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की
दहा अवतार धारी,
मूर्ती ही श्यामल श्रीरामाची,
आज रंगणार प्राणप्रतिष्ठा सोहळा
त्यानिमीत्त हार्दिक शुभेच्छा