अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत श्री रामांची प्रतिष्ठापणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.
यानंतर आता आजपासून प्रभू रामांचे दर्शन सर्वसामान्यांसाठी सुरू झाले आहे. प्रभू रामाचे भक्त त्यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत तुम्हीदेखील रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. रामलल्लाच्या दर्शनाची वेळ आणि मंदिरातील आरतीच्या वेळेसह अनेक महत्त्वाच्या माहिती आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
अयोध्येतील राम मंदिर २३ जानेवारीपासून सामान्य भाविकांसाठी खुले झाले. राम मंदिर सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे. दुपारी अडीच तास हे मंदिर रामलल्लांच्या विश्रांतीसाठी बंद राहील. यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविक दर्शनासाठी येऊ शकतात.
राम मंदिरात दिवसातून तीन वेळा रामललाची आरती होईल.
सकाळी (६:३० वा.) श्रृंगार आरती
दुपारी (६:३० वा.) भोग आरती
आणि संध्या (६:३० वा.) संध्या आरती.
तुम्हाला राम मंदिराच्या आरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्ही श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टला भेटू देऊ शकता. आरतीसाठी पास मोफत असतील. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पास बुक करू शकता.
पण लक्षात ठेवा, की सकाळच्या आरतीसाठी तुम्हाला एक रात्र आधीच बुकिंग करावी लागेल. त्यानंतरच तुम्ही सकाळच्या शृंगार आरतीमध्ये सहभागी होऊ शकाल. तर संध्याकाळच्या आरतीसाठी अर्धा तास अगोदर बुकिंग करावे लागेल.
सुरुवातीला फक्त ३० लोकच आरतीत सहभागी होऊ शकतील असे सांगण्यात येत आहे. पण भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.
प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज दीड लाखांहून अधिक भाविक अयोध्येच्या राम मंदिरात येण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत भाविकांना दर्शनासाठी १५ ते २० सेकंदांचा अवधी मिळणार आहे. वृद्ध व दिव्यांग भक्त दर्शनासाठी जात असतील तर त्यांच्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या