Ram Mandir First Anniversary: २२ जानेवारीऐवजी ११ जानेवारीला का साजरा केला जातो राम मंदिर वर्धापन दिन? जाणून घ्या कारण
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Mandir First Anniversary: २२ जानेवारीऐवजी ११ जानेवारीला का साजरा केला जातो राम मंदिर वर्धापन दिन? जाणून घ्या कारण

Ram Mandir First Anniversary: २२ जानेवारीऐवजी ११ जानेवारीला का साजरा केला जातो राम मंदिर वर्धापन दिन? जाणून घ्या कारण

Jan 11, 2025 11:51 AM IST

Ram Mandir anniversary 2025: अयोध्येतील राम मंदिर हे भारतासह जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान, भक्तीचे प्रतिक आहे. मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी या तारखेला झाले होते. मात्र, तरीही ११ जानेवारीला मंदिराचा वर्धापन दिन का साजरा केला जात आहे, जाणून घेऊ या…

२२ जानेवारीऐवजी ११ जानेवारीला का साजरा केला जातो राम मंदिर वर्धापन दिन? जाणून घ्या कारण
२२ जानेवारीऐवजी ११ जानेवारीला का साजरा केला जातो राम मंदिर वर्धापन दिन? जाणून घ्या कारण

Ram Mandir First Anniversary 2025: अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) हे लाखो हिंदूंसाठी श्रद्धा, भक्तीचे प्रतीक आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या वर्धापन दिनानिमित्त, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पौष शुक्ल द्वादशी या तिथीला हा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिथी आज ११ जानेवारी रोजी आली आहे. हा निर्णय हिंदू धर्मातील पारंपारिक प्रथेचे प्रतिबिंब आहे. हिंदू धर्मात कोणताही सण निश्चित ग्रेगोरियन तारखांऐवजी विशिष्ट चंद्रावर आधारित हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करण्याची परंपरा आहे, जी आजही पाळली जाते.

हे लक्षात घेता राम मंदिराचा वर्धापन दिन ( Ram Mandir Anniversary) दरवर्षी २२ जानेवारी रोजी नव्हे तर ११ जानेवारी रोजी साजरा केला जातो. याचे कारण आपल्याला चंद्रावर आधारलेल्या हिंदू कॅलेंडरमध्ये सापडते.

हिंदू पंचांगानुसार, मंदिराचे पावित्र्य अधिकृतपणे दर्शविणारा प्रतिष्ठा महोत्सव किंवा अभिषेक समारंभ ११ जानेवारी २०२४ रोजी पार पडला. मंदिराच्या उद्घाटनाच्या ग्रेगोरियन तारखेपेक्षा हिंदू परंपरेनुसार या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. ही प्रथा मंदिराच्या उत्सवाचे हिंदू संस्कृती आणि ज्योतिषशास्त्राशी असलेले खोल संबंध प्रतिबिंबित करते. त्याच प्रमाणे आधुनिक काळातील कॅलेंडर प्रणालींपेक्षा चंद्रावर आधारित हिंदू पंचांग किंवा दिनदर्शिकेचे आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन ११ जानेवारी रोजी

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (अभिषेक) वर्धापन दिन हा चंद्रावर आधारित हिंदू दिनदर्शिकेशी जुळवून घेतल्यामुळे २२ जानेवारीऐवजी ११ जानेवारी २०२५ रोजी राम मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. मूळ अभिषेक २२ जानेवारी २०२४ रोजी झाला होता. हा दिवस हिंदू पंचांगानुसार (कॅलेंडर) कुर्म द्वादशी हा होता.

राम मंदिर वर्धापन दिन उत्सव ११ जानेवारी ते १३ जानेवारीदरम्यान

राम मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव ११ ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान होत आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधी, प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील. या कार्यक्रमामुळे भक्त आणि संत सहभागी होऊ शकतील.

Whats_app_banner