मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Katha : आजच्या पिढीने रामायणातून कोणता धडा घ्यावा, जाणूून घ्या

Ram Katha : आजच्या पिढीने रामायणातून कोणता धडा घ्यावा, जाणूून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2024 06:56 PM IST

Shri Rama Katha : राम म्हणजे आत्मा-ज्योती. म्हणजेच, आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे. राम नेहमी आपल्या हृदयात असतो.

Shri Rama
Shri Rama (Mohd Zakir)

Shri Ram Katha : श्री राम सहज, साधा-सरळ पण दृढनिश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्रांचाच शुभचिंतक नाही तर त्याच्या आश्रयाला येणाऱ्या शत्रुंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भुमिकांमध्ये अनुकरणीय आहे. तो मर्यादा पुरूशोत्तम आहे. 

राम म्हणजे आत्मा-ज्योती. म्हणजेच, आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे. राम नेहमी आपल्या हृदयात असतो. श्री रामांचा जन्म आई कौशल्या आणि वडील दशरथ यांच्या पोटी झाला.

संस्कृतमध्ये ‘दशरथ’ म्हणजे, ‘दहा रथ असलेला.’ या ठिकाणी दहा रथ म्हणजे, आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे आणि ५ क्रिया इंद्रियांचे प्रतीक आहे. 

तर ‘कौशल्य’ म्हणजे, ‘जो कुशल आहे.’ रामाचा जन्म तिथेच होऊ शकतो जिथे ज्ञान पंचेंद्रियांच्या आणि पाच इंद्रियांच्या संतुलित कार्यात कार्यक्षमता असते.

श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला. आयोध्याचा याचा शाब्दिक अर्थ 'ज्या ठिकाणी युद्ध होऊ शकत नाही.' जेव्हा आपले मन कोणत्याही संघर्षाच्या स्थितीपासून मुक्त होते. तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो.

राम हे आपल्या आत्म्याचे प्रतीक आहे. लक्ष्मण हे सतर्कतेचे प्रतीक आहे. सीता हे मनाचे प्रतीक आहे. तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. 

जसे पाण्याचा स्वभाव वाहत जाणे आहे, तसाच मनाचा स्वभाव डगमगणे आहे. मनरूपी सीताजी सोन्याच्या हरणाकडे पाहून आकर्षित झाल्या. आपले मन वस्तूंकडे आकर्षित होते. अहंकार रूपी रावण मन रूपी सीताजींचे हरण करतो. अशा प्रकारे मनरूपी सीताजी आत्मरूपी श्री रामांपासून विलग होतात. हनुमानजींना 'पवन' पुत्र म्हणतात. सीताजींना परत आणण्यासाठी ते रामाला मदत करतात. 

श्वास आणि सतर्कता (हनुमान आणि लक्ष्मण) यांच्या मदतीने मन (सीता) पुन्हा आत्म्याशी (राम) जोडले जाते. अशा प्रकारे संपूर्ण रामायण आपल्यातच घडत असते.

रामाच्या जीवनातून मिळालेला मुख्य धडा म्हणजे शिस्त. शिस्त अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. दुसरीकडे, सर्जनशीलता आहे. सर्जनशीलतेला थोडी जागा हवी. सर्जनशीलतेला स्वातंत्र्य हवे. सर्जनशीलता आणि उत्पादकता यामध्ये समतोल आहे. तुमच्याकडे उत्तम कल्पना असू शकतात, पण त्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला शिस्त हवी..

एक राजा म्हणून, भगवान श्री रामांच्या राज्यात असेच गुण होते. यामुळेच त्यांचे राज्य विशेष बनले. महात्मा गांधींनीही ‘रामराज्य’सारखा आदर्श समाज निर्माण करण्याची कल्पना केली. ज्या राज्यात प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. रामराज्य हे गुन्हेगारीमुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करते.

कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरूंचे मार्गदर्शन घेण्याची परंपरा राजांच्या भूमिकेत समाविष्ट होती. राम भरतासोबत परतला असता तर रामायण कधीच बनले नसते. रामाने सोन्याच्या हरणाचा पाठलाग केला नसता, तर गोष्ट वेगळीच असती. अशा स्थितीत हनुमानाची भूमिकाच आली नसती. जर हनुमान नाहीत तर रामायणही नाही.

मागे वळून पाहताना, या घटना नक्कीच आव्हानात्मक वाटतात, परंतु कदाचित त्या काळातील लोकांसाठी एक आदर्श आहे. म्हणूनच भगवान रामाच्या निर्णयांची गुंतागुंत या महाकाव्याला अधिक समृद्ध करते.

भगवान रामाने एक चांगला पुत्र, शिष्य आणि राजा यांच्या गुणांचे एक आदर्श उदाहरण मांडले आहे. यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले. आजही त्यांचे म्हणजेच 'रामबाण' सारखे शब्द अशा कामांसाठी वापरले जातात,  ज्या कामात अपयशाला जागा नाही.

WhatsApp channel