Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. पंचांगानुसार, यावर्षी १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन हा सण सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगासह अतिशय शुभ योगांमध्ये साजरा केला जाईल. रक्षाबंधन हे पंचक आणि भद्राच्या प्रभावाखाली असेल. या काळात राखी बांधण्यास मनाई आहे. असे मानले जाते की, भावाला राखी बांधताना काही लहान-लहान चुका होऊ शकतात ज्याचा त्याच्या आणि तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी राखी बांधताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम...
ज्योतिष शास्त्रानुसार राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी भावाला रक्षासूत्र बांधावे. त्यामुळे शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्या. पंचांगानुसार या वर्षी राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३५ मिनिटे ते ६ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल.
रक्षाबंधनानिमित्त प्रथम देवाला राखी बांधावी. त्यांना अक्षत आणि तांदूळ लावून टिळा लावावा. मिठाई अर्पण करावी. यानंतर भावाला राखी बांधायला सुरुवात करा.
हिंदू रीतिरिवाजांमध्ये, पूजा विधी दरम्यान डोके झाकले जाते. आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा टोपीने झाका.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकवाचा टिळा आणि अक्षदा लावतात आणि नंतर त्याला राखी बांधतात, मात्र अक्षदा लावताना तांदूळ तुटलेला नाही ना, याची काळजी घ्यावी. तुटलेली अक्षदा अशुभ मानली जाते.
असे मानले जाते की, राखी बांधताना भावाने रक्षासूत्रात ३ गाठी बांधल्या पाहिजेत. या गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात.
ज्योतिष शास्त्रानुसार भावाला नेहमी उजव्या हाताला राखी बांधावी. उजवा हात कर्माशी संबंधित आहे. त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावा-बहिणींना कोणत्याही प्रकारे रागावू नका. तसेच राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे हे लक्षात ठेवा. तसेच काळ्या रंगाचा वापर कमी करा.