Raksha Bandhan : रक्षाबंधनाला ‘या’ ४ चौघडीया मध्ये बांधा राखी, भद्रा आणि पंचकची नका करू काळजी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Raksha Bandhan : रक्षाबंधनाला ‘या’ ४ चौघडीया मध्ये बांधा राखी, भद्रा आणि पंचकची नका करू काळजी

Raksha Bandhan : रक्षाबंधनाला ‘या’ ४ चौघडीया मध्ये बांधा राखी, भद्रा आणि पंचकची नका करू काळजी

Updated Aug 14, 2024 11:51 AM IST

Raksha Bandhan 2024 Muhurat : यंदा रक्षाबंधन भद्राच्या प्रभावाखाली असणार आहे. भद्राच्या छायेमुळे राखी बांधण्याच्या वेळेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घ्या यावर्षी कोणत्या शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता-

रक्षाबंधन २०२४ मुहूर्त
रक्षाबंधन २०२४ मुहूर्त

Rakhi 2024 Best Muhurat : श्रावण महिना हा सण-उत्सव आणि व्रत-वैकल्याचा पवित्र महिना आहे. या महिन्यात नागपंचमी नंतर महत्वाचा येणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्यासाठी रक्षाबंधन हा सण राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधून हा सण साजरा करतात. या वर्षी रक्षाबंधन किंवा राखीचा सण १९ ऑगस्ट २०२४, सोमवारी आहे.

रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. विशेष म्हणजे श्रावणाचा तीसरा सोमवार रक्षाबंधनाच्या दिवसासोबत येतो. मात्र, यंदा रक्षाबंधनावर भद्रा आणि पंचकचा प्रभाव असल्याने राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्ताबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रक्षाबंधनासाठी भद्राचा काळ अशुभ मानला जातो. भद्राला कोणत्याही शुभ कार्यासाठी यज्ञ केला जातो. भद्रा शुभ नसल्याने ती संपल्यानंतरच रक्षाबंधन साजरा करावे असे सांगितले जाते.

या वर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-

ज्योतिष शास्त्रानुसार भद्रा किंवा पंचकच्या कारणाने दुपारची वेळ योग्य नसेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळची वेळ देखील शुभ मानली जाते.

रक्षाबंधन वेळ - दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते रात्री ९ वाजून ७ मिनिटापर्यंत.

कालावधी – ७ तास ३७ मिनिटे

रक्षाबंधनासाठी दुपारची वेळ - दुपारी १ वाजून ४२ मिनिटे ते ४ वाजून १९ मिनिटापर्यंत

कालावधी – २ तास ३७ मिनिटे

रक्षाबंधनासाठी प्रदोष काळ मुहूर्त - संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटे ते रात्री ९ वाजून ७ मिनिटापर्यंत

कालावधी – २ तास ११ मिनिटे

रक्षाबंधन भद्रा प्रारंभ आणि समाप्ती वेळ - सकाळी ५ वाजून ५२ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३२ मिनिटापर्यंत.

पंचक वेळ- रात्री ७ वाजून ते २० ऑगस्ट सकाळी ५ वाजून ५२ मिनिटापर्यंत.

रक्षाबंधन भद्रा पूंछ – सकाळी ९ वाजून ५१ मिनिटे ते सकाळी १० वाजून ५३ मिनिटापर्यंत

रक्षाबंधन भाद्र मुख - सकाळी १०:५३ ते दुपारी १२:३७

पौर्णिमा तिथी केव्हा आणि किती वेळ आहे - 

पौर्णिमा तिथी १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल.

रक्षाबंधनाच्या दिवशी या चौघडिया मुहूर्तावर राखी बांधू शकतात-

अमृत ​​- सर्वोत्तम - पहाटे ५ वाजून ५२ मिनिटे ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत.

शुभ - उत्तम- सकाळी ९ वाजून ८ मिनिटे ते १० वाजून ४६ मिनिटापर्यंत.

लाभ - उन्नती- दुपारी ३ वाजून ४० मिनिटे ते संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटापर्यंत.

अमृत ​​- सर्वोत्तम - संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटापर्यंत.

Whats_app_banner