Raksha Bandhan : दुपारी भावाच्या मनगटावर राखी बांधताना करा हे ३ काम, वाढेल सुख-समृद्धी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Raksha Bandhan : दुपारी भावाच्या मनगटावर राखी बांधताना करा हे ३ काम, वाढेल सुख-समृद्धी

Raksha Bandhan : दुपारी भावाच्या मनगटावर राखी बांधताना करा हे ३ काम, वाढेल सुख-समृद्धी

Updated Aug 18, 2024 03:32 PM IST

Raksha Bandhan 2024 Remedy : रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टी विशेषतः लक्षात ठेवल्या पाहिजेत. भावाच्या मनगटावर राखी बांधताना विशेषत: बहिणींनी ही गोष्ट केलीच पाहिजे.

रक्षाबंधन २०२४ उपाय
रक्षाबंधन २०२४ उपाय (Shutterstock)

Raksha Bandhan 2024 : श्रावणाच्या तीसऱ्या सोमवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी भाऊ-बहिणी रक्षाबंधनाचा सण शुभ योगात साजरा करतील. हा दिवस भाऊ आणि बहिणींमधील अतूट प्रेम आणि विश्वासाला समर्पित आहे. रक्षाबंधनाला अनेक शुभ योगायोग घडत आहेत. श्रावण सोमवारसोबतच श्रावण पौर्णिमा, सर्वार्थ सिद्धी, रवि आणि शोभन योगात रक्षाबंधन हा सण साजरा होईल. यादिवशी स्नान-दान करायलाही शुभ मानले जात आहे. शास्त्रानुसार, श्रावण पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन भाद्राकाळ टाळून शुभ मुहूर्तावर साजरा करणे चांगले आहे. अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेषत: बहिणींनी राखी बांधताना ही गोष्ट केलीच पाहिजे. असे केल्याने भावाला दीर्घायुष्याचे वरदान मिळते आणि त्याच्या जीवनात सुख-समृद्धीही येते.

रक्षासूत्र बांधण्यासाठी मुहूर्त

रक्षाबंधन भद्रा समाप्ती वेळ – दुपारी १ वाजून ३० मिनिटे.

रक्षाबंधन भद्रा पूंछ – सकाळी ९:५१ ते सकाळी १०:५३

रक्षाबंधन भद्रा मुख - सकाळी १०:५३ ते दुपारी १२:३७

पौर्णिमा तिथी प्रारंभ - १९ ऑगस्ट २०२४ पहाटे ३ वाजून ४ मिनिटे.

पौर्णिमा तिथी समाप्ती - १९ ऑगस्ट २०२४ रात्री ११:५५ वाजता

रक्षाबंधन शुभ वेळ - दुपारी १:३० ते रात्री ९:८

कालावधी – ७ तास ३८ मिनिटे

रक्षाबंधनासाठी दुपारची वेळ - दुपारी १ वाजून ४३ मिनिटे ते ४ वाजून २० मिनिटे.

कालावधी – २ तास ३७ मिनिटे

रक्षाबंधनासाठी प्रदोष काळ मुहूर्त - संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटे ते रात्री ९ वाजून ८ मिनिटे.

कालावधी - २ तास ११ मिनिटे

राखी बांधताना या ३ गोष्टी करा

श्रावण पौर्णिमेला बहिण भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा म्हणजे राखी बांधते. राखीमध्ये तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ नात्यातील गोडीसाठी आहे. 

राखी बांधल्यानंतर कपाळावर अनामिकेने कुंकवाचा टिळा लावून अंगठ्याने वर उचलून हा टिळा शिखरासारखा लावण्याची परंपरा आहे. यानंतर बहिणी या टिळ्यावर अक्षता लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भावाच्या आयुष्यात गोडवा कायम राहावा म्हणून बहीण त्याला गोड-धोड खाऊ घालते. यानंतर भाऊही बहिणींना भेटवस्तू देतात. 

रक्षाबंधनात रक्षासूत्र बांधताना “येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामभिबध्नामि रक्षे माचल माचल।”  मंत्र पठण करणे शुभ मानले जाते. धर्मशास्त्रात इंद्राणीने युद्धावर जाण्यापूर्वी देवराज इंद्राला रक्षासूत्र बांधले होते. रक्षाबंधन म्हणजे भावाने आपल्या बहिणीसाठी प्रेम आणि संरक्षणाची प्रतिज्ञा करणे होय.

Whats_app_banner