Raksha Bandhan Bhadra Kal : श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाला भद्रा काळाची सर्वांनाच चिंता असते, कारण असे म्हटले जाते की भद्राकाळात भावाला राखी बांधली जात नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार आहे. यावेळीही बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार आहे. रक्षाबंधनाचा सण १९ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
पौर्णिमा तिथी यावर्षी १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होत आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार रक्षाबंधन १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. राखी बांधण्यासाठी रात्री १ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून ८ मिनिटे ही सर्वोत्तम वेळ आहे. एकूण ०७ तास ३८ मिनिटांचा मुहूर्त प्राप्त होत आहे. जर तुम्हाला संध्याकाळी राशी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत आहे.
रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असेही म्हटले जाते की, शूर्पणखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती. ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले. म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये. यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटे ते १० वाजून ५३ मिनिटापर्यंत राहील आणि दुपारी १ वाजून ३० मिनिटे ही अंतीम वेळ आहे. त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकतात.
'रक्षाबंधन' या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद 'संरक्षणाची गाठ' असा होतो. या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये राखी बांधणे सर्वांसाठी सारखे आहे. बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबेरंगी धागा बांधते, ज्याला राखी असे म्हणतात. भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो. तसेच, भाऊ आपल्या बहिणीला खास अशी भेटवस्तू देतो.
दिवा, कुंकू, अक्षदा, मिठाई आणि राखी यांनी भरलेली एक पूजेचे ताट तयार केले जाते. बहिण आपल्या भावाला कपाळावर कुंकू आणि अक्षदा लावून, आरती करतात. त्यानंतर, भावाच्या मनगटाभोवती राखी बांधताना आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात, भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांच्या स्नेहाचे चिन्ह म्हणून भेटवस्तू देतात आणि त्यांना संरक्षणाचे वचन देतात.
संबंधित बातम्या