Sambhaji Maharaj Rajyabhishek Din: छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन; पराक्रम, नीती, त्यागाचे होते स्मरण
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sambhaji Maharaj Rajyabhishek Din: छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन; पराक्रम, नीती, त्यागाचे होते स्मरण

Sambhaji Maharaj Rajyabhishek Din: छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन; पराक्रम, नीती, त्यागाचे होते स्मरण

Jan 16, 2025 10:27 AM IST

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा १६ जानेवारी हा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. १४ मे १६५७ रोजी पंरदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८२ रोजी संपन्न झाला.

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन; पराक्रम, नीती, त्यागाचे होते स्मरण
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन; पराक्रम, नीती, त्यागाचे होते स्मरण

Chhatrapati Sambhaji Maharaj: थोर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा १६ जानेवारी दिवस दरवर्षी राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. स्वराज्याचे किंवा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती अशी संभाजी महाराज यांची ओळख आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी राजे होते. तसेच ते विद्वान म्हणूनही ओळखले जात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला. त्याने रायगड किल्ला काबीज करण्याचाही मोठा प्रयत्न केला. पण यात त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय आपण डोक्यावक मुकूट चढवणार नाही, अशी शपथच औरंगजेबाने घेतली. मात्र महाराजांचे महुणे औरंगजेबाला फितूर झाले आणि महाराजांना पकडण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले. त्यांनी मोठ्या धैर्याने लढा दिला. ११ मार्च १६८९ रोजी महाराजांना वीरमरण आले.

विद्वान छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज हे विद्वान राजे म्हणून ओळखले जातात. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, नखशीख, सतसतक हे ग्रंथ लिहिले. पैकी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेत लिहिले होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम

छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर, शक्तिशाली आणि पराक्रमी योद्धा म्हणून परिचित होते. त्यांनी अत्यंत कमी काळात तब्बल १२० लढाया जिंकल्या. ते तलवारबाजीत निपुण होते. त्यांना युद्धकलेचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी मोगलांबरोबरच, आदिलशहा, सिद्धी आणि पोर्तुगिजांविरुद्ध संघर्ष केला.

छत्रपती संभाजी महाराज अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण आजी राजमाता जिजाऊ यांनी केले. वयाच्या ९व्या वर्षीच त्यांना ५ हजारांची मनसबदारी मिळाली होती. ते ९ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना आग्रा येथे नेले होते. छत्रपती संभाजी महाराज हे वयाच्या १८ व्या वर्षी युवराज झाले होते. तर वयाच्या २३ व्या वर्षी ते छत्रपती बनले. महाराजांनी १६८१ ते १६८९ या कालावधीत राज्य केले.

छत्रपती संभाजी महाराज हे प्रजेप्रमाणेच आपल्या सैन्यावर प्रेम करणारे छत्रपती होते. ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्य केले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु आपले स्वराज्य कोणाच्याही स्वाधीन केले नाही. अशा या थोर राजाला मानाचा मुजरा.

Whats_app_banner