Rajmata Jijau Punyatithi 2024: महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. शिवरायांना बालपणापासूनच तलवारबाजी, घोडेस्वारी अशा विविध गोष्टींमध्ये राजमाता जिजाऊंनीं आपल्या देखरेखीत घडवले होते. येत्या ३० जून रोजी राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. तारखेबाबत संभ्रम असल्याने दर वर्षी तारखेनुसार आणि तिथीनुसार अशा दोन पुण्यतिथी साजऱ्या होतात. परवा दिवशी साजरी होणारी ही पुण्यतिथी तिथीनुसार असणार आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला होता.
महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासातील प्रचंड कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमाता जिजाऊंनी पारतंत्र्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्याचे अनन्यसाधारण कार्य केले होते. याशिवाय विखुरलेल्या देशबांधवांना एकनिष्ठतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत आजही प्रत्येक व्यक्ती जिजाऊंच्या संस्कारांचे आचरण करते.
राजमाता जिजाऊ अत्यंत हुशार, धाडसी, सद्गुण आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. अगदी लहान वयापासूनच जिजाऊ एक उत्तम घोडेस्वार देखील होत्या. शिवाय त्या तलवारबाजीतसुद्धा पारंगत होत्या. स्वतःमध्ये असलेले हे सर्व गुण त्यांनी आपल्या शिवरायांनासुद्धा दिले होते. शिवरायांना जन्मपासूनच जिजाऊंचे सुंदर संस्कार लाभले होते. त्यामुळेच स्वराज उभे राहू शकले. ३० तारखेला राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी असून, त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी काही प्रेरणादायी संदेश आपण पाहूया.
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना
पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा!
राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
नाव तुमचे न मिटणार…
थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब
उपकार कधी ना फिटणार…
स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
जिजाऊंची गौरव गाथा
त्यांच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राजमाता जिजाऊसाहेब भोसले
यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा!
संबंधित बातम्या