मराठी बातम्या  /  धर्म  /  Rajmata Jijau Punyatithi : राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी, करा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi : राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी, करा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Jun 17, 2024 11:13 AM IST

Rajmata Jijau Punyatithi 2024 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची आज १७ जुन रोजी, तारखेप्रमाणे पुण्यतिथी आहे. यानिमीत्ताने त्यांना अभिवादन करा.

राजमाता जीजाऊ पुण्यतिथी
राजमाता जीजाऊ पुण्यतिथी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६६४ साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला.

अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे.

जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लाभले, म्हणूनच स्वराज उभे राहिले. अशा राजमाता जिजाऊ मातेची आज पुण्यतिथी असून, त्यांना विनम्र अभिवादन करा.

ट्रेंडिंग न्यूज

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जिजाऊ ची गौरव गाथा

तिच्या चरणी माझा माथा..

स्वराज्यप्रेरिक राजमाता

राजमाता जिजाऊसाहेब भोसले

यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा !

ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,

त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन

मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्यप्रेरिका महिला

स्वराज्याचे स्वप्न फुलवले, जोपासले व पूर्ण केले

अशा जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

शिवराय अन शंभू छावा

तुमच्या शिवाय नसता मिळाला

आम्हांला स्वराज्याचा ठेवा

जय जिजाऊ!

जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

चंद्र सूर्य असे पर्यंत

नाव तुमचे न मिटणार…

थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब

उपकार कधी ना फिटणार…

स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!

जिजाऊ...

ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती

याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती

राजमाता जिजाबाईंना आदरांजली !

मुजरा त्या मातेला,

जिने घडविला राजा रयतेचा ।।

गनिमांस तिने नमविला,

वसा स्वराज्याचा चालविला।।

राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना

पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली

पहार काढून ज्या माऊलीने

गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला

त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त

त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

मराठ्यांचा इतिहास घडवणारी, 

स्वराज्य प्रेरिका, 

राष्ट्रमाता जिजाऊ

यांच्या पुण्यतिथी निमित्त

त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन

WhatsApp channel