Radha Ashtami Wishes : राधाअष्टमी निमित्त तुमच्या प्रियजणांना द्या 'या' हटके शुभेच्छा-radha ashtami 2024 wishes in marathi post captions quotes status heart touching messages shubhechha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Radha Ashtami Wishes : राधाअष्टमी निमित्त तुमच्या प्रियजणांना द्या 'या' हटके शुभेच्छा

Radha Ashtami Wishes : राधाअष्टमी निमित्त तुमच्या प्रियजणांना द्या 'या' हटके शुभेच्छा

Sep 11, 2024 11:01 AM IST

Radha Ashtami 2024 Wishes : राधाअष्टमीला राधेची पूजा करुन तिची जयंती साजरी करतात. धार्मिक मान्यतेनुसार राधा अष्टमीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात प्रेम आणि आनंद मिळतो. या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजणांना राधाअष्टमीच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करू शकतात.

राधाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधा अष्टमी साजरी करण्यात येते. जन्माष्टमीच्या बरोबर १५ दिवसांनी राधाअष्टमी येते. यावर्षी राधा अष्टमी ११ सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी साजरी होत आहे. या दिवशी लोक राधेची पूजा करुन तिची जयंती साजरी करतात. धार्मिक मान्यतेनुसार राधा अष्टमीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात प्रेम आणि आनंद मिळतो.

राधा अष्टमीला व्रत ठेवा आणि श्री राधा कृष्णाची पूजा करा. जीवनात सुख, समृद्धी आणि शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजणांना राधाअष्टमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.

राधाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

मथुरा नगरी झाली दंग पाहुनी

कृष्णाची खोडी,

यमुनेच्या काठावरी दिसे

राधा-कृष्णाची जोडी

राधाअष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा

तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती,

सुख-शांती आणि समृद्धी लाभो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

राधाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

राधेच्या हृदयात श्याम आहे,

राधेच्या श्वासांत श्याम आहे.

राधेच्या ध्यासात श्याम आहे आणि

म्हणूनच दुनियेच्या मुखात राधा-कृष्ण नाम आहे.

राधाअष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा

राधाने त्यागाचा मार्ग स्वीकारला तर

कृष्णाने प्रत्येक वाटेवर फुले उधळली.

राधाने जेव्हा प्रेमाची इच्छा व्यक्त केली.

कृष्णाने प्रेमाचे मूल्य वाढवले

राधाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

सांजवेळी होई

राधा कृष्णाची भेट

यमुनेच्या किनारी,

संगती वेणूचे सूर घुमती

देउनी प्रीतीची ललकारी

राधाअष्टमीच्या शुभेच्छा

राधे नावावर विश्वास ठेवा,

तुमची कधीही फसवणूक होणार नाही.

प्रत्येक प्रसंगी कृष्ण

तुमच्या घरी पहिले येईल.

जय श्री राधे कृष्ण,

राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

राधाकृष्णाची भेट हे फक्त निमित्त होते,

जगाला प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी

राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कीकडे घननिळा ,सावळा कान्हा,

तर दुसरीकडे राधिका गोरी…

असे भासतात जणू

चंद्र आणि चकोरी…

राधाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

राधाअष्टमीला राधेला काय अर्पण करावे

राधाष्टमीला राधेला पंचामृत अर्पण करावे. कृष्ण कन्हैया आणि राधा राणी या दोघांनाही पंचामृत अत्यंत प्रिय आहे. यानंतर आरती केल्यानंतर पिवळी मिठाई आणि फळेही अर्पण करावीत. त्यांना मालपुआ किंवा रबडी मिठाई म्हणून नैवेद्य अर्पण करावा.राधा देवीचे पूजन आणि व्रताबाबत भविष्य पुराण व नारद पुराणात उल्लेख आल्याचे आढळून येते.

Whats_app_banner
विभाग