Putrada Ekadashi Wishes : नवीन वर्षातील पहिल्या पुत्रदा एकादशीला प्रियजणांना द्या या खास शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Putrada Ekadashi Wishes : नवीन वर्षातील पहिल्या पुत्रदा एकादशीला प्रियजणांना द्या या खास शुभेच्छा

Putrada Ekadashi Wishes : नवीन वर्षातील पहिल्या पुत्रदा एकादशीला प्रियजणांना द्या या खास शुभेच्छा

Jan 10, 2025 08:47 AM IST

Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi : पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी केले जाते. ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत करावे. नवीन वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी तिथी शुक्रवार १० जानेवारी २०२५ रोजी असून, यानिमित्त प्रियजणांना द्या मन:पूर्वक शुभेच्छा.

पुत्रदा एकादशी २०२५ शुभेच्छा
पुत्रदा एकादशी २०२५ शुभेच्छा

Ekadashi 2025 Wishes In Marathi : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. नवीन वर्षातील पहिली पौष पुत्रदा एकादशीचे व्रत शुक्रवारी १० जानेवारीला आहे. याला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी केले जाते. ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत करावे. या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने योग्य संतान, पुण्य आणि मोक्ष प्राप्त होतो. यावेळी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी शुभ योग तयार होत आहे.

पौष पुत्रदा एकादशी तिथीचा प्रारंभ : गुरुवार ९ जानेवारी, दुपारी १२ वाजून २२ मिनिटे.

पौष पुत्रदा एकादशी तिथीची समाप्ती : शुक्रवार १० जानेवारी, सकाळी १० वाजून १९ मिनिटे.

एकादशी पूजा मुहूर्त : शुक्रवार १० जानेवारी रोजी, सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३७ मिनिटापर्यंत.

पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुराण आणि महाभारतात सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितले होते की पौष महिन्यात पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास संततीचे सुख मिळते. याशिवाय हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनही सुखी राहते. भगवान विष्णूच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशी निमित्त प्रियजणांना या खास शुभेच्छा पाठवा.

पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा -

ॐ नारायणाय विद्महे।

वासुदेवाय धीमहि।

तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम।

पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर

भगवान विष्णू तुमच्या मुलांना

सुख, शांती, समृद्धी देवो.

पुत्रदा एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

ॐ लक्ष्मी नारायण नमो नम:

तुम्हाला संतती आणि संपत्तीचे सुख मिळो.

पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्यास

भगवान श्री हरींची कृपा राहते व

सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.

पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख दर्शन व्हावे आता,

तू सकळ जगाचा दाता,

घे कुशीत या माऊली,

तुझ्या चरणी ठेवतो माथा

पुत्रदा एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

पाणी घालते तुळशीला

वंदन करते देवाला

सदा आंनदी ठेव माझ्या नातलग आणि मित्रांना

पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

 

एकादशीस अन्नपान ।

जे नर करिती भोजन ।

श्‍वानविष्ठेसमान ।

अधम जन ते एक ॥१॥

ऎका व्रताचें महिमान ।

नेमें आचरती जन ।

गाती ऎकती हरिकिर्तन ।

ते समान विष्णुसीं

पुत्रदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Whats_app_banner