मराठी बातम्या  /  धर्म  /  Putrada Ekadashi : एकादशी तशा महिन्याला दोन असतात, पण पुत्रदा एकादशीचं महत्त्व वेगळंच; जाणून घ्या मुहूर्त व पारायण वेळ

Putrada Ekadashi : एकादशी तशा महिन्याला दोन असतात, पण पुत्रदा एकादशीचं महत्त्व वेगळंच; जाणून घ्या मुहूर्त व पारायण वेळ

HT Marathi Desk HT Marathi
Aug 27, 2023 11:20 AM IST

Putrada Ekadashi : आपल्याकडील प्रत्येक व्रत-वैकल्यांमागे एखादी कथा असते. पुत्रदा एकादशी देखील यास अपवाद नाही. काय आहे ही कथा?

Putrada Ekadashi 2023
Putrada Ekadashi 2023

Putrada Ekadashi 2023 muhurat : धर्मशास्त्र आणि शिवपुराणानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील सणवार, व्रत-वैकल्ये आणि पूजाअर्चा याचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात एकादशी येते. परंतु 'पुत्रदा एकादशी' वर्षातून दोनदा येते. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि श्रावण महिन्याच्या शुक्लपक्षात. यंदाच्या श्रावणातील पुत्रदा एकादशी विशेष आहे. कारण या दिवशी 'आदित्य पूजना' चाही योग आहे.

विष्णुपुराणात सूर्य देवता हे विष्णूचं रूप असल्याने पुत्रदा एकादशी दिवशी निःसंतान दाम्पत्यांसाठी संतान प्राप्ती आणि संतती सौख्य, संततीच्या प्रगतीसाठी पुत्रदा एकादशी व्रत, भगवंत विष्णूची पूजा अधिक फलदायी आणि लाभदायक ठरणार आहे. पौराणिक काळात अशा रितीने संततीप्राप्ती साठी व्रत, यज्ञ केले जात असत. श्रीरामाचे पिता राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केल्याचा उल्लेख शास्त्रात आहे.

Festivals in September : सप्टेंबर महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल; पाहा तारीख, वार आणि महत्त्व

पुत्रदा एकादशी व्रत मुहूर्त :

पुत्रदा एकादशी: २७ ऑगस्ट २०२३ मध्यरात्री २२ वा ०९ मी एकादशी तिथी सुरु. २७ ऑगष्ट २०२६ रात्री ०९ वा ३३ मी एकादशी तिथी समाप्ती.

ट्रेंडिंग न्यूज

व्रत पारायण वेळः २७ ऑगस्ट २०२३ मध्यरात्री २२ वा ०९ ते २८ ऑगस्ट २०२३ सूर्योदय ०६ वा २२ मी.

देवता: श्री विष्णू भगवान.

महीसित राजा आणि परमज्ञानी लोमश ऋषीची कथा!

पुत्रदा एकादशीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार द्वापार युगात महिष्मती नगरीत महासित नावाचा राजा राज्य करत होता. राजा अत्यंत धर्मज्ञानी, पराक्रमी, दानी आणि शांतीप्रिय होता. त्रैलोक्याचं वैभव असतानाही राजा आणि त्यांच्यी पत्नी मात्र निःसंतान असल्याने दुःखी असत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी माहीसीत राजाने आपल्या महिष्मती नगरीतील सर्व विद्वान ज्ञानी ऋषी, मुनीवरांना राजदरबारी बोलावून घेतले आणि संतान प्राप्तीसाठी उपायाची विचारणा केली. यावर परमज्ञानी लोमश ऋषींनी राजांना पूर्वजन्मी श्रावण महिन्यातल्या एकादशी दिवशी त्यांनी एका गायीला तलावात पाणी पिण्यास मजाव केल्याचे स्मरण करून दिले. याचं 'गो' शापामुळे आपण नि:संतान आहात. या पापातून आणि शापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही पत्नीसह एकादशीला विधीवत श्रीविष्णुपुजन करून 'पुत्रदा व्रत' करावे असे सुचवले. तेव्हा राजाने लोमश ऋषींचा सल्ला मान्य करीत आपल्या पत्नीसह विधीपूर्वक श्रावणातील शुक्ल पक्ष एकदशीला व्रत आणि पारायण केले. आणि फलस्वरूप महीसित राजा 'गो' शापातून मुक्त झाला. काही काळानंतर राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. राजाने पुत्राच्या सौख्यासाठी हे व्रत प्रत्येक श्रावणातील एकादशीस केले आणि प्रजेसही या पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व सांगीतले. महीसित राजाचा हाच पुत्र पुढे जाऊन महापराक्रमी राजा झाला. धर्मशास्त्रात अशा रितीने पुत्रदा एकादशीचे महत्त्व विशद केले आहे.

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel