Prosperity Tips: सकाळी उठल्याबरोबर करा 'ही' 3 काम, लक्ष्मी होते प्रसन्न! मिळतो पैसा, सर्व इच्छा होतात पूर्ण
मराठी बातम्या  /  धर्म  /  Prosperity Tips: सकाळी उठल्याबरोबर करा 'ही' 3 काम, लक्ष्मी होते प्रसन्न! मिळतो पैसा, सर्व इच्छा होतात पूर्ण

Prosperity Tips: सकाळी उठल्याबरोबर करा 'ही' 3 काम, लक्ष्मी होते प्रसन्न! मिळतो पैसा, सर्व इच्छा होतात पूर्ण

Jul 12, 2024 12:50 PM IST

Prosperity Tips: शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या सवयी असतात. ज्या अगदी साध्या सोप्या असतात. परंतु, ९९% लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.

Prosperity Tips
Prosperity Tips

Prosperity Tips: सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळात लोकांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य राखणे अत्यंत कठीण असते. मात्र काही लोक अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध राहून सर्व गोष्टींमध्ये समतोल राखतात. मात्र काही लोकांना कष्ट करून, नियोजन करूनसुद्धा काहीच साध्य होत नाही. या लोकांच्या घरामध्ये सतत आर्थिक चणचण, वादविवाद, नकारत्मकता दिसून येते. बहुतांशवेळा हे लोक आपल्या जीवनाबद्दल निराश आणि अस्वस्थ होतात. आपल्या आयुष्यात चमत्कारिक गोष्टी घडून, सकारात्मक बदल व्हावेत अशी अपेक्षा ते करत असतात. आपल्या घरात ऐश्वर्य, वैभव, सुख आणि समृद्धी नांदो म्हणून ते धडपडत असतात.

अशावेळी ज्योतिष शास्त्रात काही महत्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या सवयी असतात. ज्या अगदी साध्या सोप्या असतात. परंतु ९९% लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. आणि याच सवयी तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. घरातील नकारात्मकता, आर्थिक अडचणी, बिघडलेले मानसिक स्वास्थ्य यावर ज्योतिष शास्त्रात महत्वाचे ३ उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय प्रत्येक व्यक्तीला करणे सहज शक्य व्हावेत असेच आहेत. यासाठी एक रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. विशेष म्हणजे एका जागेवर बसून तुम्ही हे उपाय करू शकता. हे उपाय नेमके काय आहेत ते जाणून घेऊया.

Geeta Updesh: शरीराने नव्हे तर चांगल्या मनाने बनते व्यक्तीची ओळख! काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? वाचा...

सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ ३ काम

१) ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी डोळे उघडल्याबरोबर अंथरुणात बसूनच सर्व प्रथम आपल्या पूर्वेकडील देवीदेवतांचे स्मरण करावे. आणि त्यांना नमस्कार करून तीन वेळा आपल्या मनातील इच्छेचा मनातल्या मनात जप करावा. हे जर ब्रह्म मुहुर्तात घडले तर उत्तमच असते. असे केल्याने काही काळातच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल.

२)सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसल्या बसल्या आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांना पाहावे. कारण आपल्या हातामध्ये देवी लक्ष्मी आणि अन्य देवीदेवतांचा वास असतो. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. आणि आर्थिक चणचण दूर होते. शिवाय तुमच्या हाताने केलेल्या प्रत्येक कार्याला यश येते. शिवाय तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जातो.

३)यामध्ये तिसरा उपाय म्हणजे अंथरुणात बसल्या बसल्याच धरती मातेला प्रणाम करावे. आणि त्यानंतर आपला उजवा पाय अंथरुणाबाहेर टाकून उठावे. असे केल्याने अवघ्या काही दिवसांत तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळतात.

Whats_app_banner