मराठी बातम्या  /  religion  /  प्रयागराजमध्ये फिरायचा प्लॅन करताय? ही ठिकाणे नक्की पाहा
प्रयागराजमध्ये फिरायचा प्लॅन करताय? ही ठिकाणे नक्की पाहा
प्रयागराजमध्ये फिरायचा प्लॅन करताय? ही ठिकाणे नक्की पाहा (PTI)

प्रयागराजमध्ये फिरायचा प्लॅन करताय? ही ठिकाणे नक्की पाहा

18 November 2022, 12:04 ISTSuraj Sadashiv Yadav

मोगलांनी आक्रमण केल्यानंतर अकबराने प्रयागराजचे नाव बदलले होते. गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या प्रयागराजमध्ये अध्यात्माशिवाय इतरही अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

भारतातलं अध्यात्मिक असं शहर अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये तीन नद्यांचा संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर प्राचीन काळापासून हिंदू सभांचे आयोजन केले जाते. प्रयागराज या नावाची फोड केल्यास 'प्रा'चा अर्थ होतो प्रथम आणि 'याग'चा अर्थ होतो भक्ती. प्रयाग गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमाचेही प्रतिक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोगलांनी आक्रमण केल्यानंतर अकबराने प्रयागराजचे नाव बदलले होते. अकबर इलाहबास नावाने प्रभावित होता. त्या नावाचा अर्थ देवाचा वास असा आहे. अकबराचा नातू शाहजहाँने शहराचं नाव बदलून ते इलाहाबाद असं केलं. प्रयागराजमध्ये अध्यात्मिक ठिकाणांशिवाय इतरही अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

कुंभमेळा
जगात तीर्थयात्रा करणाऱ्यांचा सर्वात मोठा मेळा म्हणून कुंभ मेळा ओळखला जातो. मोठ्या संख्येने हिंदू पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी या मेळ्यात येतात. कुंभ मेळा दर तीन वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन अशा क्रमाने होते. तर हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये दर सहा वर्षांनी अर्ध कुंभ मेळाही आय़ोजित केला जातो.

त्रिवेणी संगम
मध्य भारतातील सर्वात पवित्र अशा ठिकाणांपैकी त्रिवेणी संगम प्रयागराजमध्ये नागरी सिव्हील लाइन्सपासून जवळपास ७ किलोमीटर अंतरावर आहे. इथे तीन नद्या गंगा, यमुना, सरस्वती एकत्र येतात. याच ठिकाणी दर १२ वर्षांनी एकदा कुंभ मेळा आयोजित केला जातो.

खुसरो बाग

लुकरगंजमध्ये असलेली खुसरो बाग प्रयागराजमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. खुसरो बागेत मुघलकालीन वास्तु आहेत. यामध्ये जहांगीर कुटुंबातील शाह बेगम, खुसरो मिर्झा आणि सुल्थान निथार बेगम यांचे मकबरे याठिकाणी आहेत. बलुआ दगडातील हे बांधकाम आहे.

आनंद भवन
आनंद भवन हे नेहरु कुटुंबियांचे निवासस्थान होते. आता इथे भारतात स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळ्या कलाकृती आणि लेख इत्यादींचे प्रदर्शन असणारं संग्रहालय आहे. दोन मजली इमारतीचा आराखडा मोतीलाल नेहरू यांननी तयार केला होता. तसंच चीन आणि युरोपातील लाकडाचे फर्निचर आणि जगभरातील वेगवेगळ्या कलाकृतींनी ते सजवलं आहे.