Pradosh Vrat in December: डिसेंबर महिन्यातील प्रदोषाचे व्रत भोलेनाथांना समर्पित असते. डिसेंबर मध्ये प्रदोष व्रताची तिथी २ वेळा येत आहे. एक शुक्र प्रदोष व्रत आणि दुसरे शनी प्रदोष व्रत. प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. असे मानले जाते की प्रदोषाचे व्रत केल्याने भक्ताचे सुख आणि सौभाग्य वाढते. जाणून घेऊ या, डिसेंबर महिन्यात प्रदोष व्रत केव्हा होणार, पूजेची पद्धत काय आहे, मंत्र आणि शुभ मुहूर्त-
डिसेंबरमध्ये प्रदोष व्रत कधी आहे?
हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथी १२ डिसेंबरपासून सुरू होते, जी १३ डिसेंबरच्या सकाळपर्यंत राहील. अशा परिस्थितीत डिसेंबरचे पहिले शुक्ल प्रदोष व्रत १३ डिसेंबर रोजी केले जाणार आहे. तर डिसेंबर महिन्यातील कृष्ण त्रयोदशी तिथी २८ डिसेंबरपासून सुरू होत आहे, जी २९ डिसेंबरच्या सकाळपर्यंत राहील. हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबरमहिन्यातील दुसरे कृष्ण प्रदोष व्रत २८ डिसेंबर रोजी केले जाईल. पंचांगानुसार खालीदिलेल्या शुभ मुहूर्तावर पूजा-पाठ करा
१. शुक्र शुक्ल प्रदोष व्रत, त्रयोदशी तिथी प्रारंभ - १२ डिसेंबर, २०२४ रात्री १०:२६ वाजता.
शुक्र शुक्ल प्रदोष व्रत, त्रयोदशी तिथी समाप्त - १३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०७:४० वाजता
प्रदोष पूजा मुहूर्त - ०५:२६ ते संध्याकाळी ०७:४०
वेळ- ०२ तास १४ मिनिटे
दिवसाचा प्रदोष वेळ - ०५:२६ ते ०८:१०
२. शनी कृष्ण प्रदोष व्रत- त्रयोदशी तिथी प्रारंभ - २८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०२:२६ वाजेपर्यंत
शनी कृष्ण प्रदोष व्रत, त्रयोदशी तिथी समाप्त - २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०३:३२ वाजेपर्यंत
प्रदोष पूजा मुहूर्त- ०५:३३ ते रात्री ०८:१७
कालावधी - ०२ तास ४४ मिनिटे
दिवसाचा प्रदोष वेळ - ०५:३३ ते रात्री ०८:१७
स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. शिवपरिवारासह सर्व देवी-देवतांची विधिवत पूजा करा. उपवास ठेवायचा असेल तर हातात पवित्र पाणी, फुले आणि अक्षत घेऊन व्रत ठेवण्याची प्रतिज्ञा करा. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावावा. त्यानंतर शिवमंदिरात किंवा घरात भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करावी आणि शिवकुटुंबाची विधिवत पूजा करावी.
त्यानंतर प्रदोष व्रताची कथा ऐकावी. त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तीभावाने भगवान शंकराची आरती करावी. शेवटी ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मग शेवटी क्षमा याचना करा.
Disclaimer: या लेखात दिलेल्या माहितीवर आम्ही दावा करत नाही की ती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या