Pitru Paksha Ravi Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रत हा हिंदू धर्मात महत्त्वाचा दिवस मानला जातो. शास्त्रात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी व्रत केल्यास अक्षय फळ मिळते. तसेच, भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्यासाठी ही तारीख सर्वोत्तम मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस शिवपूजेसाठी खास आहे. हिंदू कॅलेंडरनुसार पितृ पक्षातही प्रदोष व्रत येईल. जाणून घ्या पितृ पक्षातील प्रदोष व्रत कधी आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. प्रदोष व्रताला शिवपूजेचा सण असेही म्हणतात. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि शिवाची पूजा केल्याने अनेक पटींनी शुभ फळ मिळते. शिवपुराणानुसार पितृ पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग, दुःख आणि दोष नाहीसे होतात. जाणून घ्या पितृ पक्षातील रवि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि व्रताचे महत्त्व-
शिवपुराणानुसार, प्रदोष काळात कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला त्रयोदशीला भगवान शिवाची भक्तीपूर्वक पूजा करावी. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की प्रदोष काळात भगवान शिव रजत भवनात नृत्य करतात आणि आनंदी मुद्रेत राहतात.
सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत, मंगळवारी भौम प्रदोष व्रत, बुधवारी बुध प्रदोष व्रत, गुरुवारी गुरु प्रदोष व्रत, शुक्रवारी शुक्र प्रदोष व्रत, शनिवारी शनि प्रदोष व्रत आणि रविवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला रवि प्रदोष व्रत असे म्हणतात.
प्रदोष व्रतामध्ये सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर ४५ मिनिटे पूजा केली जाते. याला प्रदोष काळ म्हणतात.
भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. पंचांगानुसार रवि प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटे ते 0८ वाजून ३३ मिनिटापर्यंत असेल.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रदोष व्रत पाळल्याने आयुर्मान वाढते. आजारांपासून आराम मिळेल. या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे सुख-समृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात.