प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. हे व्रत देवांचे देव महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानले जाते. कार्तिक महिन्यातील हे प्रदोष व्रत देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरे केले जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रदोष व्रत बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी केले जाईल. म्हणून याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाईल. मान्यतेनुसार बुध प्रदोष व्रत सर्व मनोकामना पूर्तीसाठी केले जाते. जाणून घेऊया प्रदोष व्रताची तिथी, शुभ मुहूर्त, पूजेची सोपी पद्धत आणि महत्व.
कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत : पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १४ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. त्यामुळे त्रयोदशी तिथीला प्रदोष काळ पूजेचा मुहूर्त लक्षात घेऊन १३ नोव्हेंबर रोजी प्रदोष व्रत केले जाणार आहे.
प्रदोष काळ पूजा मुहूर्त : या दिवशी सायंकाळी ५.१७ ते ७.५६ या वेळेत प्रदोष काळ पूजेचा शुभ मुहूर्त तयार होत आहे.
साहित्य : चंदन, अक्षत, फळे, फुले, बेलपत्र, जनेऊ, कळवा, कापूर, दीवा, अबीर, गुलाल इ.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावे. देवघरातून शिळी फुले काढून मंदिराची स्वच्छता करावी. देवघरातील देवांची पूजा करावी. शिवलिंगाला जल अर्पण करा. मंदिरात दिवा लावावा. शिव-गौरी आणि गणेशाची विधिवत पूजा करा. शिवाची आरती करून संध्याकाळच्या पूजेची तयारी करा, शक्य असल्यास संध्याकाळी पुन्हा स्नान करा. यानंतर शिवमंदिरात जाऊन घरीही शिवलिंगाला पाणी, बेलपत्र, फळे, फुले, भांग आणि चंदन अर्पण करावे. शिवाच्या मंत्रांचा जप करा. यानंतर महादेवाची आरती करावी. शेवटी पूजेच्या वेळी कळत-नकळत केलेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी.
हा शुभ दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पीत आहे आणि त्यांची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. यामुळे जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि आनंद येतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)