Pradosh Vrat : जुलै महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, वेळ आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pradosh Vrat : जुलै महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, वेळ आणि महत्व

Pradosh Vrat : जुलै महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, वेळ आणि महत्व

Updated Jun 30, 2024 08:40 PM IST

Pradosh Vrat in July 2024 : प्रदोष व्रताची तिथी महिन्यातून दोनदा येते. असे मानले जाते की प्रदोष व्रत आणि भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात.

प्रदोष व्रत
प्रदोष व्रत

Pradosh Vrat in July 2024 : प्रदोष व्रत हे देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी, उपवास केला जातो आणि संध्याकाळी भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात प्रदोष व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की प्रदोष व्रत आणि भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. प्रदोष व्रताची तिथी महिन्यातून दोनदा येते. जुलै महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया.

प्रदोष व्रत कधी आहे?

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण त्रयोदशी तिथी ३ जुलैपासून सुरू होत असून ती ४ जुलैच्या पहाटेपर्यंत चालेल. अशा स्थितीत जुलै महिन्याचे पहिले कृष्ण प्रदोष व्रत ३ जुलै रोजी पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्याची शुक्ल त्रयोदशी १८ जुलैपासून सुरू होत असून ती १९ जुलैच्या सायंकाळपर्यंत राहील. अशा स्थितीत जुलैचे दुसरे शुक्ल प्रदोष व्रत १८ जुलै रोजी पाळले जाणार आहे

जुलै प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

पहिला प्रदोष व्रत

त्रयोदशी तिथी प्रारंभ - ३ जुलै २०२४ सकाळी ७ वाजून १० मिनिटे

त्रयोदशी तिथी समाप्ती - ४ जुलै २०२४ सकाळी ५ वाजून ५४ मिनिटे

प्रदोष वेळ - संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटे ते रात्री ९ वाजून २४ मिनिटापर्यंत

कालावधी - २ तास १ मिनिटे

दुसरा प्रदोष व्रत

त्रयोदशी तिथी प्रारंभ - १८ जुलै २०२४ रात्री ८ वाजून ४४ मिनिटे

त्रयोदशी तिथी समाप्ती - १९ जुलै २०२४ संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटे

प्रदोष वेळ - संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटे ते रात्री ९ वाजून २३ मिनिटे

कालावधी - २ तास ३ मिनिटे

पूजा विधी

आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. शिव परिवारासह सर्व देवी-देवतांची विधिवत पूजा करावी. उपवास ठेवायचाच असेल तर हातात पाणी, फुले आणि अक्षत घेऊन व्रत करण्याचा संकल्प करा. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात दिवा लावावा. त्यानंतर शिवमंदिरात किंवा घरी शिवाचा अभिषेक करून शिव परिवाराची विधीवत पूजा करावी. आता प्रदोष व्रताची कथा ऐका. त्यानंतर तुपाचा दिवा लावून पूर्ण भक्तिभावाने शंकराची आरती करावी. शेवटी ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शेवटी क्षमा प्रार्थनाही करा.

Whats_app_banner