Pradosh Vrat July 2023 : शनिप्रदोषाच्या दिवशी ‘या’ गोष्टींचं दान केल्याने होतात अशुभ प्रभाव दूर
Pradosh Vrat July 2023 :शनिवारच्या शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आणि श्रावणात ज्या व्यक्ती शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी करतील त्यामुळे महादेवही प्रसन्न होतील आणि ज्या व्यक्ती महादेवांना अभिषेक करतील त्या व्यक्तींवरही शनिची कृपादृष्टी राहील.
शनि प्रदोष व्रत १५ जुलै २०२३ रोजी होणार आहे आणि या व्रताच्या दोन दिवसांनी म्हणजेच १८ जुलै २०२३ रोजी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरूवात होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत आव़डता महिना मानला जातो आणि या महिन्यात भगवान शिवाचा पृथ्वीवर सर्वत्र वास असतो असं मानलं जातं. त्यामुळेच भक्त मोठ्या संख्येनं श्रावणात महादेवाची पूजा करतात.
ट्रेंडिंग न्यूज
अशीच पूजा शनिदेवांनीही केली होती आणि भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले होते. महादेवांनी शनिला न्याय देणारी देवता म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हापासून शनिदेव महादेवांच्या आवडत्या राशींना किंवा आवडत्या व्यक्तींना पीडा लावत नाहीत.
त्यामुळेच शनिवारच्या शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आणि श्रावणात ज्या व्यक्ती शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी करतील त्यामुळे महादेवही प्रसन्न होतील आणि ज्या व्यक्ती महादेवांना अभिषेक करतील त्या व्यक्तींवरही शनिची कृपादृष्टी राहील.
सध्या कोणत्या राशींवर सुरू आहे साडेसाती आणि शनिची ग्रहदशा?
सध्या मीन, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरू आहे. दुसरीकडे, मेष आणि वृश्चिक राशीवर शनीची ग्रहदशा चालू आहे.
या राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावेत?
शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात शनिवारी आणि सोमवारी काळ्या तिळाचे दान करा. काळे तीळ शनि महाराज आणि भगवान शिव दोघांनाही प्रिय आहेत. या उपायाने ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात.
शनि महाराजांशी संबंधित वस्तू म्हणजेच काळी उडदाची डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल इत्यादींचे दान श्रावणाच्या शनिवारी करा.
शनीची महादशा चालू असल्यास गहू, मका, ज्वारी, उडीद, तांदूळ आणि हरभरा या सहा प्रकारच्या धान्यांचे दान करावे.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी लोखंडी वस्तू दान करा. परंतु या दिवशी स्वतःच्या वापरासाठी लोखंडी वस्तू खरेदी करू नका. या दिवशी तुम्ही लोखंडी वस्तू दान करू शकता. हे अत्यंत शुभ मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग