Pradosh Vrat : भौम प्रदोष व्रत कसे करतात? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी
Bhaum Pradosh Vrat : भगवान शंकराला समर्पित असलेलं प्रदोष व्रत अनेक शिवभक्त मनोभावे करतात. आज भौम प्रदोष व्रत आहे. त्याविषयी…
Pradosh Vrat : प्रदोष व्रत हे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. मंगळवारचे प्रदोष व्रत भौम प्रदोष व्रत म्हणून ओळखलं जातं. हे प्रदोष व्रत अत्यंत शुभ मानलं जातं. भौम प्रदोष व्रत मनोभावे व विधीवत केल्यास शिवभक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, असं मानलं जातं. या व्रतामुळं शंकराबरोबरच हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशीही धार्मिक मान्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भौम प्रदोष व्रत कसं केलं जातं? आजच्या व्रताचा मुहूर्त काय आहे? कोणते विधी करावे लागतात आणि त्यासाठी नेमकं काय साहित्य लागतं याविषयी जाणून घेऊया…
शुभ वेळ:
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी ६ वा. ०४ मि. ते रात्री ११ वा. ०१ मि.
शिवयोग - १२ सप्टेंबर रोजी १२.१४ ते १३ सप्टेंबर १.१२ मिनिटे
प्रदोष काळ : संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.४९
व्रत कसं कराल?
पहाटे लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर स्वच्छ पांढरे कपडे घाला.
भगवान शंकराला जलाभिषेक करा. घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा.
हे सगळं झाल्यानंतर प्रदोष व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करा.
यथासांग पूजा करा आणि शंकराची आरती करा.
ओम नम: शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
सर्व पूजाविधी झाल्यावर देवापुढं हात जोडून प्रार्थना करा. देवाकडं क्षमा मागा.
पूजा साहित्याची यादी
फळे, फुले, कोरफड, धोतऱ्याची फुलं, अक्षता, अगरबत्ती, गंगाजल, बिल्वपत्र, काळे तीळ, पांढरे फूल, सफेद चंदन, तुपाचा दिवा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारीत आहे. ही माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं या माहितीच्या आधारे काही करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)
विभाग