मराठी बातम्या  /  धर्म  /  नवीन वर्षातील पहिला प्रदोष व्रत व मासिक शिवरात्री संयोग, वाचा पूजेची शुभ वेळ, पूजा विधी व मान्यता

नवीन वर्षातील पहिला प्रदोष व्रत व मासिक शिवरात्री संयोग, वाचा पूजेची शुभ वेळ, पूजा विधी व मान्यता

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 09, 2024 12:17 PM IST

Pradosh vrat and masik shivratri 2024: मंगळवार ९ जानेवारी २०२४ चा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी वर्षातील पहिला प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री व्रत आहे. असा योगायोग वर्षभरात क्वचितच पाहायला मिळतो.

Pradosh vrat and masik shivratri january 2024
Pradosh vrat and masik shivratri january 2024

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी साजरी होत आहे. अशा परिस्थितीत २०२४ च्या पहिल्या महिन्यातील पहिला प्रदोष व्रत व मासिक शिवरात्री कधी आहे, पूजा वेळ, महत्व आणि मान्यता जाणून घ्या.

प्रत्येक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रदोष व्रत अत्यंत फायदेशीर मानला जातो. नवीनवर्ष २०२४ चा पहिला प्रदोष व्रत खूप महत्वाचा असेल, कारण हा दिवस शिवाच्या प्रिय मासिक शिवरात्रीच्या व्रताशी संयोग साधतो आहे.

प्रदोष व्रत दरम्यान, शिवपूजा संध्याकाळी केली जाते, म्हणून प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीच्या दिवशी संध्याकाळी वैध आहे. तर मासिक शिवरात्री चतुर्दशीला साजरी करतात. अशात प्रदोष व्रत आणि शिवरात्री कधी साजरी करायची असा संभ्रम निर्माण होत असेल, परंतू प्रदोष व्रत व मासिक शिवरात्री ९ जानेवारी २०२४ रोजी साजरी होईल.

शुभ मुहूर्त आणि वेळ

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी ८ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११:५८ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ९ जानेवारी २०२४ रोजी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल.

या वर्षातील पहिला प्रदोष व्रत ९ जानेवारी २०२४ रोजी पाळण्यात येणार आहे. हे भौम प्रदोष व्रत असेल. या दिवशी शिवपूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५:१ ते ८:२४ पर्यंत असेल.

चतुर्दशी तिथी ९ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०:२४ नंतर सुरू होईल, जी १० जानेवारी २०२४ रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटापर्यंत चालेल. या स्थितीत शिवरात्रीचे व्रत पाळणारे मासिक शिवरात्रीची पूजाही त्याच दिवशी करू शकतात. दुपारी १२:१ ते १२:५५ पूजेसाठी शुभ वेळ आहे.

प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री व्रत यांचा संयोग मागील जन्मातील पाप, दुःख आणि पापांपासून मुक्त होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा स्थितीत शिवाची उपासना करणाऱ्यांना दुहेरी लाभ मिळेल. तर हे भौम प्रदोष व्रत असल्यामुळे आरोग्यविषयक समस्या आणि समृद्धीसाठी केले जाते.

व्रत पूजा विधी:

त्रयोदशीच्या दिवशी स्नानानंतर स्वच्छ, पांढर्‍या रंगाची वस्त्रे घाला. देवपूजा करा. प्रथम गणेशाची, नंतर शिव-पार्वतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून प्रथेप्रमाणे पूजा करावी. देवाला नैवेद्य अर्पण करा आणि १०८ वेळा नामजप करा. शिव मंत्रांचा उच्चार, आरती आणि नंतर व्रत कथा पठण करून पूजा संपन्न करावी.

WhatsApp channel

विभाग