महिन्यातील दोन्ही त्रयोदशी तिथींना प्रदोष व्रत केले जाते. अशा प्रकारे वर्षभरात २४ प्रदोष व्रत होतात. ऑगस्ट महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत श्रावण कृष्ण त्रयोदशीला केला जात आहे. प्रदोष व्रतामध्ये ज्याला शक्य होते ते उपवास करतात. महादेव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी वरियान योगात, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल आणि १ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी समाप्त होईल. प्रदोष काळात या व्रताचे पूजन करण्याचे महत्त्व असल्याने श्रावण प्रदोष व्रत ३१ ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे आणि शनिवारी हे व्रत आल्याने याला शनिप्रदोष व्रत संबोधले जाते.
प्राचीन काळाची कथा आहे. एका नगरातील सेठ धन आणि वैभवाने संपन्न होते. तो खूप दयाळू होता. त्याच्या इथे आलेला कोणीही रिकाम्या हाती परतत नसे. मनापासून ते प्रत्येकाला दान देत असत. पण इतरांना आनंदी पाहून सेठ आणि त्याची पत्नी स्वतः खूप दुःखी होते. त्यांना संतती नसणे हेच त्यांच्या दुःखाचे कारण होते. एके दिवशी त्या श्रीमंत जोडप्याने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले आणि आपले काम सेवकांवर सोडले. ते नुकतेच शहराबाहेर आले असता त्यांना एका विशाल वृक्षाखाली समाधीत एक तेजस्वी ऋषी दिसले. साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी, असा विचार दोघांच्याही मनात आला. पती-पत्नी दोघेही समाधी घेतलेल्या साधूसमोर हात जोडून बसले आणि ते कधी आपल्याला बघतील आणि आपल्याशी बोलतील याची वाट पाहू लागले. पूर्ण दिवस संपला तरी साधूची समाधी काही मोडली नाही. पण सेठ पती-पत्नी धीराने हात जोडून बसले होते.
शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी ते ऋषी समाधीतून उठले. पती-पत्नीला पाहून ते मंद हसले आणि आशीर्वादासाठी हात उंचावून म्हणाले, वत्सा तुझ्या मनाची गोष्ट मला कळली आहे! तुमचा संयम आणि भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. ऋषींनी त्यांना संततीच्या जन्मासाठी शनि प्रदोष व्रत करण्याची पूजा पद्धत सांगितली, तीर्थयात्रा करून दोघेही घरी परतले आणि नियमितपणे शनि प्रदोष व्रत करू लागले. कालांतराने सेठच्या पत्नीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. शनि प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे हे दु:ख दूर झालं आणि दोघेही सुखाने राहू लागले.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.