Pradosh Vrat 2024 : मार्चचा दुसरा प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pradosh Vrat 2024 : मार्चचा दुसरा प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Pradosh Vrat 2024 : मार्चचा दुसरा प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Mar 11, 2024 10:25 PM IST

Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रत हे शास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी भक्त कडक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात.

Pradosh Vrat 2024 : मार्चचा दुसरा प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
Pradosh Vrat 2024 : मार्चचा दुसरा प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. हा दिवस देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच उपवासही केला जातो. भौतिक सुख आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी साधक हे व्रत करतात.  

भक्तांच्या श्रद्धेनुसार, असे केल्याने साधकाला दीर्घायुष्य लाभते आणि जीवनात आनंद मिळतो. प्रत्येक महिन्यात २ प्रदोष व्रत असतात. मार्च महिन्यातील पहिला प्रदोष व्रत ८ मार्च रोजी झाला. तर आता या महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत शुक्रवारी (२२ मार्च) रोजी पाळण्यात येणार आहे. 

मार्च महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत कधी

प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी २२ मार्च रोजी पहाटे ०४:४४ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मार्च रोजी सकाळी ०७:१७ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत मार्च महिन्याचा दुसरा प्रदोष व्रत २२ मार्च रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे.

शिवपूजा मंत्र

“ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही, तन्नो रुद्रः प्रचोदयात्”.

''ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनानमृत्योरमुखिया मामृतत्''.

प्रदोष व्रत नियम

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघरात दिवा लावाला. प्रदोष कालात म्हणजे संधिप्रकाशात प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे. अशा वेळी भगवान शंकराचा गंगाजलाने अभिषेक करावा. आता धतुरा, शमीची फुले, बिल्वाची पाने इत्यादी वस्तू महादेवाला अर्पण करा. यानंतर आरती करा आणि शिव चालीसा पाठ करा. यानंतर देवाला विशेष वस्तू अर्पण करा. शेवटी लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पूजेनंतर उपवास सोडावा.

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner