प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. हा दिवस देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच उपवासही केला जातो.
भक्तांच्या श्रद्धेनुसार, असे केल्याने साधकाला दीर्घायुष्य लाभते आणि जीवनात आनंद मिळतो. प्रत्येक महिन्यात २ प्रदोष व्रत असतात. मार्च २०२४ मध्ये प्रदोष व्रत कधी पाळला जाईल? ते येथे जाणून घेऊ.
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी ८ मार्च रोजी आहे. पंचांग नुसार, त्रयोदशी तिथी ८ मार्च मध्यरात्री ०१:१९ वाजता सुरू होईल आणि ८ मार्च रोजी रात्री ०९:५७ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत ८ मार्च रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी २२ मार्च रोजी पहाटे ०४:४४ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मार्च रोजी सकाळी ०७:१७ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत २२ मार्च रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघरात दिवा लावाला. प्रदोष कालात म्हणजे संधिप्रकाशात प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे. अशा वेळी भगवान शंकराचा गंगाजलाने अभिषेक करावा. आता धतुरा, शमीची फुले, बिल्वाची पाने इत्यादी वस्तू महादेवाला अर्पण करा. यानंतर आरती करा आणि शिव चालीसा पाठ करा. यानंतर देवाला विशेष वस्तू अर्पण करा. शेवटी लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या