Shani Pradosh Vrat 2024 : भगवान भोलेनाथाच्या पूजेसाठी श्रावण महिना हा अतिशय उत्तम काळ मानला जातो. ५ ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण सोमवार संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. भोलेनाथांचा आशीर्वाद भक्तांवर सदैव राहत असला तरी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्तांकडे ३ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे, जो खूप शुभ ठरू शकतो. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला केले जाते. पंचांगानुसार, शनि प्रदोष व्रत आज म्हणजेच १७ ऑगस्ट २०२४ रोजी शनिवारी पाळण्यात येणार आहे. या दिवशी शंकरासोबत शनिदेव महाराजांचीही पूजा केली जाते. चला जाणून घेऊया श्रावण प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत...
पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल. जी १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदयातिथीनुसार प्रदोष व्रत १७ ऑगस्ट २०२४ रोजी शनिवारी पाळण्यात येणार आहे. शनिवारी येत असल्याने याला शनि प्रदोष व्रत म्हटले जाईल. या दिवशी प्रीती योग आणि आयुष्मान योग देखील तयार होतील.
या दिवशी प्रदोष काळ पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटे ते रात्री ९ वाजून ९ मिनिटापर्यंत आहे.
शनि प्रदोषाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे.
आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मंदिर स्वच्छ करावे.
यानंतर भगवान शंकराच्या पूजेची तयारी सुरू करा.
पूजेचे साहित्य गोळा करा आणि लाल किंवा पिवळे कापड लहान व्यासपीठावर पसरवा.
आता या पोस्टवर शिव परिवाराची प्रतीमा चौरंगावर स्थापन करा.
भगवान शंकराला फळे, फुले, अगरबत्ती आणि नेवैद्य अर्पण करा.
यानंतर शिव परिवारासह सर्व देवी-देवतांची मनोभावे पूजा आणि आरती करावी.
शिवलिंगावर जल अर्पण करा आणि शक्य असल्यास दिवसभर फळआहार घ्या.
यानंतर प्रदोष काळ मुहूर्तावर संध्याकाळी शिवपूजा सुरू करा.
शिवलिंगावर गंगाजल, कच्चे दूध, रुईचे फुले, बेलपत्र आणि भांग यासह सर्व पूजा साहित्य अर्पण करा.
मनातल्या मनात भगवान शिवाच्या बीज मंत्राचा 'ॐ नमः शिवाय' जप करा.
शनि प्रदोष व्रताची कथा वाचा किंवा ऐका. शिव आरतीनंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा.
या दिवशी शिव मंदिरासोबतच शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.