Kartiki Ekadashi 2023: दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. प्रबोधिनी एकादशीला देवउठनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णुची पूजा केली जाते. प्रबोधिनी एकादशीच्या भगवान विष्णु चार महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. त्यानंतरच सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. या दिवशी अनेकजण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात. या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. दरम्यान, प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व, पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊयात.
यावर्षी प्रबोधिनी एकादशी येत्या २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू ५ महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतील. शालिग्राम आणि तुळशीमातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशीमातेच्या विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे. कारण. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे.
कार्तिक शुक्ल एकादशीला २२ नोव्हेंबर २०२३ ला रात्री ११.०३ ला सुरवात होईल. तर, २३ नोव्हेंबर २०२३ला रात्री समाप्त होईल. या दिवशी सकाळी ०६.५० वाजल्यापासून सकाळी ०८.०९ वाजेपर्यंत पूजा केली जाणार आहे. त्यानंतर रात्री ०५.२५ ते ०८.४६ पर्यंत पूजा केली जाईल. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०६.५१ ते सकाळी ०८.५७ या दरम्यान उपवास सोडला जाईल.
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून भगवान विष्णूची पूजा करून उपवास ठेवावा. त्यानंतर विष्णूच्या मूर्तीसमोर त्यांचा जागर करावा. संध्याकाळी पूजास्थळी देवी-देवतांच्या समोर तुपाचे ११ दिवे लावावेत. शक्य असल्यास उसाचा मंडप बनवून मध्यभागी विष्णूची मूर्ती ठेवावी. ऊस, पालापाचोळा, लाडू इत्यादी हंगामी फळे भगवान विष्णुला अर्पण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिवासर संपल्यानंतरच उपवास सोडावा.
संबंधित बातम्या