हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. १२ नोव्हेंबर ला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. ही एकादशी देवोत्थानी, प्रबोधिनी, देवउठनी आणि देवोत्थान एकादशी या नावांनीही ओळखली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णू झोपेचे चार महिने पूर्ण केल्यानंतर उठतात. देवउठणीच्या दिवशी माता तुळशीचा विवाहही आयोजित केला जातो. चला जाणून घेऊया देवउठनी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, पारण वेळ आणि पूजा विधी साहित्याची संपूर्ण यादी…
तिथी प्रारंभ - ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजून ४६ मिनीटे
एकादशी तिथी समाप्ती - १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०४ वाजून ०४ मिनीटे
व्रत पारणा वेळ - १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ४२ मिनीटे ते ०८ वाजून ५१ मिनीटे
श्री विष्णूचे चित्र किंवा मूर्ती, फूल , नारळ, सुपारी, फळे, लवंग, धूप, दीप, तूप, पंचामृत, अक्षत, तुळशीची पाने, चंदन, मिठाई इ.
सकाळी लवकर उठून देैनिंदिन कामे आटोपून स्नान करून घ्यावे. देवघरातील देवांची पूजा करावी, दिवा लावावा. भगवान विष्णूला गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. भगवान विष्णूला फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा. देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाहही केला जातो. या दिवशी भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुळशीचा विवाह केला जातो. या दिवशी माता तुळशी आणि शालिग्राम देवाची विधीपूर्वक पूजा करावी. देवाची आरती करा. देवाजवळ क्षमा प्रार्थना करा.
एकादशीच्या दिवशी देवाला केवळ सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे लक्षात ठेवा. भगवान विष्णूच्या भोगात तुळशीचा समावेश नक्की करा. असे मानले जाते की, भगवान विष्णू तुळशीशिवाय भोग घेत नाहीत. या शुभ दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा. या दिवशी देवाचे जास्तीत जास्त ध्यान करा.
या दिवशी भगवान विष्णू ५ महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतील. शालिग्राम आणि तुळशीमातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशीमातेच्या विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे. कारण. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे.