Sankashti Chaturthi : पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi : पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi : पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Published Sep 19, 2024 03:28 PM IST

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ.

पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी २०२४
पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी २०२४

Sankashti Chaturthi September 2024 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. याच्या साह्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

प्रत्येक महिन्यात २ चतुर्थीचे व्रत असतात. पहिली कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आणि दुसरी शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपतीच्या पूजेबरोबरच चंद्रदेवाला जल अर्पण केले जाते. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तारीख, चंद्रोदय वेळ आणि पूजा पद्धती.

संकष्टी चतुर्थी कधी आहे?

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २० सप्टेंबर रोजी रात्री ९:१५ वाजता सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:१३ वाजता संपेल. त्यामुळे उदया तिथीनुसार २१ सप्टेंबर रोजी पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी हर्षण योगाचाही योगायोग आहे. शुभ कार्यासाठी हर्षण योग सर्वोत्तम मानला जातो. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३६ ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८:१८ पर्यंत हर्षण योग राहील.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत :

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला. देवघर स्वच्छ करा. घर आणि मंदिरात गंगाजल शिंपडा. चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड पसरवा. त्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आता गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा. श्रीगणेशाला फळे, फुले, दुर्वा, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा. भगवान गणेशाच्या बीज मंत्राचा जप करा 'ॐ गं गणपतये नमः'. गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडू अर्पण करा. सर्व देवी-देवतांसह श्रीगणेशाची आरती करा आणि लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - ९ वाजून ४ मिनिटे

ठाणे - ९ वाजून ३ मिनिटे

पुणे - ९ वाजून ०० मिनिटे

रत्नागिरी - ९ वाजून ५ मिनिटे

कोल्हापूर - ९ वाजून २ मिनिटे

सातारा - ९ वाजून १ मिनिटे

नाशिक - ८ वाजून ५८ मिनिटे

अहमदनगर - ८ वाजून ५६ मिनिटे

पणजी - ९ वाजून ६ मिनिटे

धुळे - ८ वाजून ५२ मिनिटे

जळगाव - ८ वाजून ४९ मिनिटे

वर्धा - ८ वाजून ३७ मिनिटे

यवतमाळ - ८ वाजून ३९ मिनिटे

बीड - ८ वाजून ५२ मिनिटे

सांगली - ९ वाजून ०० मिनिटे

सावंतवाडी - ९ वाजून ५ मिनिटे

सोलापूर - ८ वाजून ५३ मिनिटे

नागपूर - ८ वाजून ३४ मिनिटे

अमरावती - ८ वाजून ४० मिनिटे

अकोला - ८ वाजून ४३ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ८ वाजून ५२ मिनिटे

भुसावळ - ८ वाजून ४८ मिनिटे

परभणी - ८ वाजून ४७ मिनिटे

नांदेड - ८ वाजून ४४ मिनिटे

उस्मानाबाद - ८ वाजून ५२ मिनिटे

भंडारा - ८ वाजून ३२ मिनिटे

चंद्रपूर - ८ वाजून ३५ मिनिटे

बुलढाणा - ८ वाजून ७४ मिनिटे

इंदौर - ८ वाजून ४४ मिनिटे

ग्वाल्हेर - ८ वाजून २८ मिनिटे

बेळगाव - ९ वाजून २ मिनिटे

मालवण - ९ वाजून ६ मिनिटे

 

Whats_app_banner