Pitru Paksha Important tips : देशातील रुढी-परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा १७ सप्टेंबरपासून सुरू होत असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात. पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात.
पितृपक्षाला श्राद्धपक्ष असंही म्हणतात. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं. जे व्यक्ती श्राद्धकर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी समाजमान्यता आहे.
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात काही कामे करणं अशुभ मानलं जातं. तर, काही कामं शुभ मानली जातात.
> पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं.
> श्राद्धपक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं.
> या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं.
> ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं, असं म्हणतात.
> पितृपक्षात कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये.
> या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्ये करण्यास मनाई आहे.
> पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं.
> या काळात केस कापणं, नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं, असं सांगितलं जातं.
> या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
> पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं.