भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पितृपक्ष म्हटलं कि नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो. जरी १२ महिने तो अपमान सहन करत असतो, तरी हे १५ दिवस कावळ्यांची मज्जा असते.
काही पुराणांमध्ये कावळा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार, इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रुप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतीग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमायाचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की, कावळा रुपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल, अशी एक कथा सांगितली जाते.
रामायणात कावळ्यांबद्दल अनेक कथा आहेत. एका कथेनुसार, दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सिता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडीलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही. यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सिता महाराजंचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का बघतो. दुपार होऊन जाते परंतू, राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मध्यान्ह टळायला लागते या चिंतेत, सीता व ब्राम्हण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतुन दशरथ महारांजांचे दोन्ही हाताची ओजंळ बाहेर येते. सिता म्हणते माझ्याजवळ देण्याारखे काहीाही नाही. महाराज सीतेला सांगतात तु ज्याठिकाणी बसली आहेस तेथील वाळु माझ्या हतावर दिली तरी चालेल.
सीता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तिथे येतो व सीतेला म्हणतो तू हे काय केलेस, माझ्या वडीलांच्या हातावर वाळु ठेवलीस! ती म्हणते असे करण्यास त्यांनीच सागीतले होते. ह्या झाडावरचा कावळा, ही गोमाता, हे ब्राम्हण आणि यमुना माता याला साक्ष आहे.
राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का कावळा भगवान रामा पुढे काहीही बोलत नाही. ब्राम्हण, गोमाता, यमुना नदीसुध्दा शांत बसते. सीता संतापते व म्हणते सत्य माहीत असून तुम्ही सांगत नाही, मला खोटी पाडतात, मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपशकुन समजतील असा शाप दिला. गोमातेला पुजतील परंतू शिळं अन्न देतील असा शाप दिला. ब्राम्हण असून सुध्दा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला. यमुने माते तुझ्या उदरातुन माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तु गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजु पर्यंत व उजव्या बाजु पर्यत माझी नजर पोहचेल तीथपर्यत तुझे पात्र केोरडे पडेल.
चौघे रामाला म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणुन आम्ही गप्प बसलो. यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो परंतू सीता शाप परत घेत नाही आणि उशाप देते.
कावळ्याला म्हणते तुझे दर्शन अपशकून समजतील परंतू श्राध्दाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील. गोमातेला उशाप देते की लोक तुझी पुजा करतील पण पाठी मागुन. म्हणुन गाईची पुजा किंवा नमस्कार पाठी मागुन करतात.
ब्राम्हणाला उशाप देते ज्या वेळेस घरात लग्नकार्य वगैरे असतील त्या वेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल. आणि यमुनेला उशाप देते की, जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रिया कर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज भासणार नाही. आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्य भागी कोरडे आहे.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.