Pitru Paksha : पितृ पंधरवडा सुरू होतोय! जाणून घ्या तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व-pitru paksha 2024 start and end date shradh tithi and significance purnima to amavasya ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pitru Paksha : पितृ पंधरवडा सुरू होतोय! जाणून घ्या तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व

Pitru Paksha : पितृ पंधरवडा सुरू होतोय! जाणून घ्या तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व

Sep 15, 2024 12:32 PM IST

Pitru Paksha 2024 Shradha : पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. यावर्षी पितृ पक्ष मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होत आहे. जाणून घ्या सर्व तिथी आणि तारखा.

पितृ पंधरवडा २०२४ श्राद्ध पक्ष तिथी आणि तारीख
पितृ पंधरवडा २०२४ श्राद्ध पक्ष तिथी आणि तारीख

पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. धार्मिक दृष्टिकोनातून, दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असतो. 

पितृ पक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पितरांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. पूर्वज प्रसन्न असल्यास सुख, समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. या वर्षी २०२४ मध्ये पितृ पंधरवडा कधीपासून असेल ते जाणून घेऊया-

पितृ पक्ष २०२४ प्रारंभ आणि समाप्ती 

पंचांगनुसार, यावर्षी पितृ पक्ष मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होणार आहे. त्याच वेळी, पितृ पक्षाची समाप्ती २ ऑक्टोबर २०२४ रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होईल.

१७ सप्टेंबर २०२४, मंगळवार - पौर्णिमा श्राद्ध

१८ सप्टेंबर २०२४, बुधवार- प्रतिपदा श्राद्ध

१९ सप्टेंबर २०२४, गुरुवार- द्वितीया श्राद्ध

२० सप्टेंबर २०२४, शुक्रवार- तृतीया श्राद्ध

२१ सप्टेंबर २०२४, शनिवार- चतुर्थी श्राद्ध

२२ सप्टेंबर २०२४, रविवार- पंचमी श्राद्ध

२३ सप्टेंबर २०२४, सोमवार – षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध

२४ सप्टेंबर २०२४, मंगळवार- अष्टमी श्राद्ध

२५ सप्टेंबर २०२४, बुधवार - नवमी श्राद्ध

२६ सप्टेंबर २०२४, गुरुवार- दशमी श्राद्ध

२७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार- एकादशी श्राद्ध

२९ सप्टेंबर २०२४, शनिवार- द्वादशी श्राद्ध

३० सप्टेंबर २०२४, रविवार- त्रयोदशी श्राद्ध

१ ऑक्टोबर २०२४, सोमवार- चतुर्दशी श्राद्ध

२ ऑक्टोबर २०२४, मंगळवार – सर्व पितृ अमावस्या श्राद्ध

पितृपक्षाचे महत्व

पितृ पक्षात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरातच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. तसेच पितृ पक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करा. पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेष लाभ होतो, त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे, गाय, कुत्रे इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाते.

पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूर्वज मृत्युलोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. पितृ पक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आहे.

 

Whats_app_banner
विभाग