पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि भाद्रपद अमावास्येपर्यंत चालते. हे १५ दिवस पितरांना समर्पित असतात. यावेळी पितृ पक्ष १७ सप्टेंबरपासून सुरू झाले असून, २ ऑक्टोबर रोजी संपेल. असे मानले जाते की, या पंधरवडा मध्ये पूर्वज आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. पितृ पक्षादरम्यान, पितर कुटुंबाने केलेले तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान इत्यादींनी तृप्त होऊन सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात. पितृ पक्षादरम्यान श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान इ. करण्याचे फार महत्व आहे.
सध्या पित्तरपाठ चालू आहे. पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध, पितृ तर्पण करून त्यांचा आशीर्वाद हा घेतला जातो. परंतु मित्रांनो तुम्हांला माहिती आहे का जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये पित्र दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय असतो? स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पित्र दिसले तर आपल्या जीवनाशी निगडीत काही संकेत देण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर चला जाणून घेऊया स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पूर्वज दिसले तर त्याचा काय अर्थ होतो.
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीचे पूर्वज स्वप्नात शांत दिसत असतील तर समजून घ्या की त्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये शांती हवी आहे. अशा स्थितीत पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करण्यासोबतच काही उपायही करावेत.
स्वप्नात जर कोणाला आपले पीत्र किंवा पूर्वज हसताना किंवा स्मित हास्य करताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे पित्र हे खूप प्रसन्न आहेत.
जर तुम्हाला पित्र हे आनंद साजरा करताना दिसले अथवा मिठाई वाटप करतांना दिसले तर त्याचा अर्थ तुमच्या घरात लवकर गुड न्यूज मिळू शकते. असे स्वप्न दिसणे म्हणजे घरात कोणाचा तरी विवाह होणार आहे किंवा कोणाचीतरी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होणार आहे.
स्वप्नात कोणाचे पित्र दुखी किंवा नाराज दिसले तर त्याचा अर्थ होतो की, तुमचे पित्र प्रसन्न नाही. त्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. त्यांना अपेक्षीत असतील अशा गोष्टी कराव्यात.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात ते स्वतः आपल्या पूर्वजांशी बोलताना दिसले तर समजून घ्या की भविष्यात एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे.
स्वप्नात पूर्वज स्वतःहून समोर येऊन तुमच्याशी बोलत असतील तर त्याचा अर्थ त्यांना काही तरी सांगायचे आहे. असे असू शकते अशी घटना किंवा प्रसंगाची ते माहिती देऊ इच्छित आहेत की त्यांनी कोणाला सांगितली नाही, किंवा सांगायची राहून गेली.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.