Sarvapitri Amavasya : सर्वपितृ अमावस्या कधी आहे? जाणून घ्या तारीख, वेळ आणि श्राद्धाचे महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sarvapitri Amavasya : सर्वपितृ अमावस्या कधी आहे? जाणून घ्या तारीख, वेळ आणि श्राद्धाचे महत्व

Sarvapitri Amavasya : सर्वपितृ अमावस्या कधी आहे? जाणून घ्या तारीख, वेळ आणि श्राद्धाचे महत्व

Sep 04, 2024 10:46 PM IST

Sarva Pitri Amavasya 2024 : पितृ पक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. जाणून घ्या या वर्षी सर्वपित्री अमावस्या कधी आहे?

सर्वपित्री अमावस्या २०२४
सर्वपित्री अमावस्या २०२४

Sarva Pitru Amavasya 2024 Date : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होते. पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध विधी करतात. पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्याला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल, तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते.

पितृ पक्ष १७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालेल. पितृ पक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते. यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात. सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या, पितृ अमावस्या किंवा पितृपक्ष अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी पूर्वज पृथ्वीला निरोप देतात. यावर्षी सर्वपित्री अमावस्या २ ऑक्टोबर २०२४, बुधवारी आहे.

अमावस्या तिथी केव्हा आणि किती काळ आहे: 

अमावस्या तिथी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल आणि ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी समाप्त होईल.

पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पणासाठी शुभ मुहूर्त - 

पंचांगानुसार पितृ पक्षात श्राद्ध करण्यासाठी कुतुप, रौहीन इत्यादी शुभ मुहूर्त मानले जातात. श्राद्ध संबंधित विधी दुपारच्या शेवटी करावेत. श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते.

कुतुप मुहूर्त - सकाळी ११:४६ ते दुपारी १२:३३

कालावधी – ०० तास ४७ मिनिटे

रोहीन मुहूर्त - दुपारी १२:३३ ते दुपारी १:२० पर्यंत

कालावधी – ०० तास ४७ मिनिटे

अपराह्न काळ - दुपारी १:२० ते दुपारी ३:४२ पर्यंत

कालावधी – २ तास २२ मिनिटे

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्या पितरांचे श्राद्ध केले जाते - 

पंचांगानुसार, अमावस्या तिथीला अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल, काही अडचण असेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतो. अमावस्या तिथीला श्राद्ध केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते. ज्या पितरांची मृत्यु तारीख माहित नाही त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते.

Whats_app_banner