Sarva Pitru Amavasya 2024 Date : पितृ पक्ष १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालेल. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख माहित नसेल किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख विसरला असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकता. म्हणजेच पितृपक्षात येणाऱ्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या पितरांचे श्राद्ध करता येते. जर एखाद्याला तिथीनुसार श्राद्ध करता येत नसेल तर ते देखील अमावस्या तिथीलाच श्राद्ध करू शकतो. श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते.
सर्व पितृ अमावस्येला पितृ विसर्जन अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी कुटुंबातील सर्व पितरांचे श्राद्ध करता येते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांचे कल्याण होते आणि ते थेट वैकुंठाला जातात. धार्मिक ग्रंथानुसार अमावस्या तिथीला श्राद्ध केल्यास पितृदोषापासून आराम मिळतो. सर्व पितृ अमावस्येलाच पूर्वज आपल्या जगात परत जातात असे म्हणतात.
सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दानासाठी कुतुप मुहूर्त सकाळी ११:४६ ते दुपारी १२:३३ पर्यंत असेल. रौहीन मुहूर्त दुपारी १२:३३ ते १:२० पर्यंत असेल. अपराह्य काळ दुपारी १:२० ते ३:४२ अशी असेल.
या दिवशी कुत्रे, गाय, कावळे आणि मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.
भाद्रपद महिन्यात सूर्य कन्या राशीत असताना पितरांचे श्राद्ध करावे असे अथर्ववेदात सांगितले आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रात दक्षिण दिशेला पितरांची दिशा मानण्यात आले आहे. तसेच पूर्वज चंद्र लोकात राहतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम आहे.
पितृ पंधरवड्यात श्राद्ध कर्म करताना ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवू घालावे. त्यांना दान-दक्षिणा देऊन तृप्त करावे. ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)