Pitru paksha 2023 : पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी किबहुना त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. पूर्वजांच्या तिथींची माहिती नसणारे सर्वपित्री अमावस्येला विधी करतात. मात्र यंदा सर्वपित्री अमावस्येला वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आहे. त्यामुळे श्राद्ध विधी १४ ऑक्टोबर रोजी कशा कराव्यात याबाबत अधिक जाणून घेऊया...
दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो. मात्र यंदा अधिक मास आल्यामुळे पितृपक्ष पंधरा दिवस उशीरानं आला आहेत. या पंधरवड्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्याम नवमी श्राद्ध, भरणी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या या तिथीना अधिक महत्त्व दिलं जातं. यंदा वर्षातले दुसरे सूर्यग्रहण सर्वपित्र अमावस्येला आल्यामुळे श्राद्धविधी करता येतील की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसून याचा कुठलाही परिणाम श्राद्धविधीवर होणार नसल्याचे मत खगोलशास्त्राचे अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी हिंदुस्तान टाइम्स मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
शास्त्रानुसार ग्रहणकाळ पूजा, पाठ, यासाठी अशुभ मानला जातो. म्हणून पितरांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी श्राद्धविधी करावा की नाही याबाबत संभ्रम दिसून येत आहे. पण सर्वत्र अमावस्येला जरी ग्रहण आले असले तरीही पूर्वजांच्या श्रद्धविधींवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलट पूर्वगृह, दुराग्रह हे सर्व बाजूला ठेवून एकमेकांचा आदर करून केलेल्या श्राद्धविधी या पर्वजांच्या मनाला शांती देणाऱ्या ठरतील असेही सोमण यांनी सांगितलं. त्यामुळं कोणतीही शंका मनात न ठेवता आपल्या पूर्वजांच्या श्रद्धाविधी तुम्ही करण्यास हरकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या